बीड : परळी -अंबाजोगाई रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भीषण आपघात झालाय. या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उचपार सुरू आहेत. या अपघाता परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवली. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले. 


अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज साडे सात वाजताच्या सुमारास दुचाकी आणि उसाच्या ट्रॉलीचा भीषण आपघात झाला. परळीतील तीन युवक दुचाकीवरून परळीकडे येत असताना त्यांची दुचाकी उसाच्या ट्रॉलीवर धडकून हा आपघात झाला. या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे ( रा. बँक कॉलनी) , रोहित भराडीया  (रा पद्मावती गल्ली) आणि शुभम धोकटे (रा. इंडस्ट्रियल एरिया परळी) हे तिघे जण जखमी झाले आहे. यातील दोघांना रूग्णालयात नेहत असताना मृत्यू झाला. 


 दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अपघाताची चौकशी केली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या


Shashikant Warise : पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी; गृहमंत्री फडणवीसांचा निर्णय