एक्स्प्लोर
नागपुरातील टेकडी गणपतीला 1101 किलोंच्या महालाडूचा नैवेद्य
नागपूर : 1101 किलोचा महाप्रसाद आणि तोही एकच मोठा बुंदीचा लाडू. आज नागपुरातील टेकडीच्या गणेश मंदिरात गणरायाला 1101 किलोच्या बुंदीच्या महालाडूचा प्रसाद अर्पण करण्यात आला.
नागपूरचं श्रद्धास्थान म्हणजेच टेकडी गणपती. गणेशउत्सवात तर इथे जागृत देवस्थान मानणाऱ्या भाविकांची रांग लागते आणि त्यात आज वेगळेच आकर्षण सुद्धा होते. 1101 किलोचा बुंदीचा महालाडू.
दैनिक भास्कर वृत्तसमूहाने हा लाडू आज नैवेद्य म्हणून इथे अर्पण केला. 'ओम श्री गणपतये नम:' असं या महालाडूवर रंगाने लिहिण्यात आले आहे. इतक्या मेहनतीने बनवलेला हा लाडू तुटू नये म्हणून त्याला खाली सेलोफेन लावण्यात आले होते. तर त्यावरती पिस्त्याचा चुरा.
दुपारच्या आरतीत महालाडूचा नैवेद्य दाखवण्यात आला. शहरातील अनेक मान्यवर, नेते मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement