एक्स्प्लोर

धुळ्यात गाडी पुलावरुन कोसळून 7 जणांचा मृत्यू, तर अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर अपघातात 4 जणांचा मृत्यू

धुळे-उस्मानाबाद रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा तर अहमदनगरमध्ये शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

मुंबई : धुळे-उस्मानाबाद रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा तर अहमदनगरमध्ये शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातून काही मजूर उस्मानाबादकडे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. धुळे-उस्मानाबाद रस्त्यावरुन या मजुरांची पिकअप गाडी विंचूर गावाजवळील बोरी नदी पुलावरुन खाली पाण्यात कोसळली. यामध्ये गाडीतील सात जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला, तीन लहान मुले, दोन लहान मुलींचा समावेश आहे.

तर दुसरीकडे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील साई भक्तांवर काळाने घाला घातला. औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर साई भक्तांच्या कारला अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. आकाश शीलवनत, अमोल गवळकर,आकाश मोरे आणि दत्ता डांगे अशी मृतांची नावं आहेत. किरण संजय गिरी आणि संतोष राऊत गंभीर जखमी आहेत.

अपघातातील जखमींवर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील शेवली येथून शुक्रवारी रात्री नऊ वाजता सर्व मित्र कारने साईदर्शनासाठी शिर्डीला निघाले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार थेट झाडावर आदळली. मध्यरात्री रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास साऊथसिटी जवळ हा भीषण अपघात झाला. घटनेमुळे शेवली गावावर शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
NCP Amol Mitkari: अमोल मिटकरींचा आमदारकीचा शेवटचा दिवस; सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर, भावूक होत म्हणाले, 'वादळं कितीही मोठी असली...'
अमोल मिटकरींचा आमदारकीचा शेवटचा दिवस; सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर, भावूक होत म्हणाले, 'वादळं कितीही मोठी असली...'
NEET Paper Leak Case : नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर
नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
Gold-Silver Rate Today : 5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग
5-10 हजार नव्हे...PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात एका दिवसांत सर्वाधिक वाढ; सराफा बाजारात खळबळ, चांदीही 30 हजारांनी महाग
IND vs AFG Test : IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
Pydhonie Deaths: डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग; 'हिस्टोपॅथॉलॉजी' अहवालात धक्कादायक खुलासा; अवयवांचा हिरवट रंग विषबाधेचे संकेत, रिपोर्ट समोर
Nida Khan-Mateen Patel Nashik TCS Case: निदा खान ज्या घरात लपून बसली, त्या घराचा दरवाजा उघडताच काय काय आढळलं?, PHOTO
निदा खान ज्या घरात लपून बसली, त्या घराचा दरवाजा उघडताच काय काय आढळलं?, PHOTO
Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच आज हादरवणारं घडलं, PHOTO
बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच आज हादरवणारं घडलं, PHOTO
Embed widget