एक्स्प्लोर

100 फुटांवरुन मिनी बस पंचगंगेत कोसळली, 13 ठार

पुलाचा कठडा तोडून बस 100 फूट खाली कोसळली.

कोल्हापूर: शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मृतांमध्ये 16 वर्षाखालील 7 मुला मुलींचा समावेश आहे, तर तीन स्त्रीयांची प्रकृती गंभीर आहे. पुलाचा कठडा तोडून बस 100 फूट खाली कोसळली. मृतांमध्ये पुण्यातील बालेवाडी आणि पिरंगुट इथल्या लोकांचा समावेश आहे. 26 जानेवारीला लागून आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुट परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलरमधून (एमएच १२ एनएस ८५५६) निघाले होते. त्यादरम्यान कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुलाचा दगडी कठडा तोडून बस थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली. हा अपघात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. 26 जानेवारी निमित्ताने सलग सुट्ट्या लागल्याने पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुटे परिसरात राहणारे भरत केदारी , संतोष वरखडे , दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलर मधून निघाले होते. काल सकाळी हे कुटुंबीय गणपतीपुळे इथून देवदर्शन आटोपून कोल्हापूरला निघाले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, मिनी ट्रॅव्हल्स पुलाचा दगडी कठडा तोडून वरुन थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली. गाडी कोसळल्याचा आवाज एकूण त्याच परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरु केलं. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस,फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आलं . परंतु तासभर प्रयत्न करून देखील मिनी बस गाळातच रुतून बसल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आलं नाही. अखेर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि गाडीतील उर्वरित 7 जणांना बाहेर काढण्यात आले. गाडीत एकूण 14 प्रवासी होते, यातील 11 मृतदेह काढण्यात आलेत तर तीन जखमींवर सीपीआर रुगणालायात उपचार सुरु आहेत, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. कोल्हापूर पोलीस, फायरब्रिगेड, समाजसेवी संस्था आणि कोल्हापुरातील तरुणांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 4 तास रेस्क्यू ऑपरेशन केलं. अद्यापही पंचगंगा नदी पात्रात मृतदेहाचा शोध सुरू आहे. अपघात झाल्याचं समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील , जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहेत. बस कोसळली ते बचावकार्य रात्री ११.३० वा. गणपतीपुळेहून बस कोल्हापूरकडे आली. रात्री ११.३५ च्या सुमारास बस शिवाजी पुलावरुन पंचगंगा नदीत कोसळल्याचा अंदाज रात्री ११.४० वा. जुना बुधवार तालीम मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल रात्री ११.४५ परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन तातडीनं बचावकार्याला प्रारंभ रात्री ११.५० पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल, बचावकार्याला वेग रात्री १२.०० दोन जखमींना बाहेर काढण्यात यश रात्री १२.३० पहिले सहा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढले रात्री १२.४५ अपुरा प्रकाश आणि तज्ज्ञ मनुष्यबळाच्या अभामुळे बचावकार्यात अडथळे रात्री १.३० वा. आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात यश रात्री २.०० वा. घटनास्थळी क्रेन दाखल पहाटे. ३.३५ वा. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बस नदीतून काढण्यात आली, बसमध्ये आणखी  मृतदेह सापडला. पहाटे. ५.४५ वा.  अंदाजे ६ महिन्याच्या बाळाचा मृतदेह नदीतून काढण्यात आला. सकाळी ७.०० वा. नदीतून मृतदेह काढण्याचे काम थांबवले बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात वारंवार अडथळे मृतांची नावे
  1. गौरी वरखडे (वय 16)
  2. ज्ञानेश्वरी वरखडे (वय 14)
  3. संतोष वरखडे (वय 45)
  4. साहील केदारी (वय 14)
  5. निलम केदारी (वय 28)
  6. भावना केदारी (वय 35)
  7. सचिन केदारी (वय 34)
  8. संस्कृती केदारी (वय 8)
  9. श्रावणी केदारी (वय 11)
  10. सानिध्य केदारी (10 महिन्यांचं बाळ)
  11. प्रतिक नांगरे (वय 14)
  12. छाया नांगरे (वय 41)
  13. बसचालक (वय 28)
जखमी व्यक्तींची नावे
  1. प्राजक्ता दिनेश नांगरे (वय 18)
  2. मनिषा संतोष वरखडे (वय 38)
  3. मंदा भरत केदारी (वय 54)

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget