नागपूर : नागपूरमधील वेणा नदीमध्ये बोट उलटून 11 मुले बुडाली असून, यातील दोघांना वाचवण्यात यश आलं, तर एका मुलाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित मुलांचा शोध सुरु असून, अंधार झाल्यानं शोध मोहिम थांबवण्यात आली होती.


नागपूर जिल्ह्यातील वेणा जलाशयात बोट उलटून 11 विद्यार्थी  बुडाल्याची दुर्घटना घडलीय.यातील दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय. आतापर्यंत एका मुलाचा मृतदहे हाती लागला असून 8 जणांचा शोध सुरु आहे. अंधार झाल्याने अर्ध्या तासानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली. उद्या सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्या येणार आहे.

नागपुरातील 11 विद्यार्थी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी वेणा जलाशयावर गेले होते. त्यावेळी हे तरुण नावेत बसून जलाशयात गेले, मात्र अधिक वजन झाल्यानं ही नाव पलटली. आजूबाजूला काम करणाऱ्या या माहिती कळाल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.

या नावेतला अतुल ज्ञानेश्वर बावणे सोडून इतर कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता सर्वच्या सर्व पाण्यात बुडाले. अतुल कसा बसा पोहत काठावर आला.

जलाशयात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या मदतीने लगेच बचावकार्य सुरू करण्यात आलं. कोळी बांधवांनी रात्री 9.30 पर्यंत एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.