1. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची 'मातोश्री'कडे पाठ, शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवसैनिकांचीही तुरळक गर्दी https://goo.gl/BMn5T7


 

  1. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा, विदर्भाची पंढरी शेगावातही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी https://goo.gl/PAaT61


 

  1. साईचरणी 25 हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्तांना चांदीचं नाणं देणार, साई संस्थानचा निर्णय https://goo.gl/dM92zq


 

  1. शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सचिन तांबेंनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती http://abpmajha.abplive.in/


 

  1. व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित, रायगडमधील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर घटनेनंतर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय https://goo.gl/9VYhdK


 

  1. 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना, 'मी मुख्यमंत्री बोलतोय' कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची माहिती https://goo.gl/t7ZgD5


 

  1. तीन ते चार दिवसात पावसाच्या पुनरागमनाचा हवामान खात्याचा अंदाज, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता https://goo.gl/Fsv49W


 

  1. देशातला पहिला रोपांचा मॉल औरंगाबादमध्ये; शेकडो झाडांची रोपं विक्रीसाठी, मराठवाड्याच्या राजधानीतून एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/


 

  1. समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा, शिवडे गावात 45 ठिकाणी फास लटकवले https://goo.gl/XkYqoF


 

  1. मुंबईकरांसाठी खुशखबर, 'म्हाडा'च्या घरांची जाहिरात बुधवारी निघणार, लॉटरीत यंदा 784 घरं https://goo.gl/VQBWoC


 

  1. मुंबईतल्या चेंबूरमध्ये मोनो तांत्रिक बिघाडाने नव्हे, तर अपघातानेच समोरासमोर, प्रत्यक्षदर्शीचा दावा, तर मदतीसाठी दुसरी मोनो पाठवल्याचं एमएमआरडीएचं स्पष्टीकरण https://goo.gl/SKDnTt


 

  1. पुण्यात जळीतकांड, दारुच्या नशेत पर्वती भागातील 27 गाड्या जाळल्या, आरोपी अटकेत https://goo.gl/AU2jmg


 

  1. मैत्रिणीशी ओळख करुन न दिल्याने पुण्यात तरुणाला बेदम मारहाण, मुंढवा परिसरातील घटना, तीनजण अटकेत, दोनजण अजूनही फरार https://goo.gl/zGtjBa


 

  1. जीएसटीचा फटका विठूरायाच्या भक्तांना, पंढरपुरात लाडूचा प्रसाद 2 रुपयांनी महागणार https://t.co/Iq5VqKaTRx


 

  1. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवागसह सहा दिग्गज शर्यतीत, सोमवारी होणाऱ्या मुलाखतीनंतर नावावर शिक्कामोर्तब https://goo.gl/gpMoRY


 


*विशेष कार्यक्रम : चीनच्या सीमेवर अर्काईव्हजमधून, पुन:प्रक्षेपण, पाहा आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर*

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर -* https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*