एक्स्प्लोर
1.35 कोटींच्या बनावट नोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 अटकेत

नाशिक : नाशिकमध्ये 1.35 कोटींच्या बनावट नोटांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अटक केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तर 1 लाख 80 हजाराच्या जुन्या खऱ्या नोटा, सुमारे दीड लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा, अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या. बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करत 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 3 आलिशान कारही जप्त केल्या.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















