एक्स्प्लोर

खुशखबर! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD - इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) व्यक्त केला आहे.

मुंबई : ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD - इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) व्यक्त केला आहे. आयएमडीने जून महिन्यात जाहीर केलेल्या माहितीमध्ये मान्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर ऑगस्ट महिन्यात 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. आयएमडीने गुरुवारी (1 ऑगस्ट) दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातही जून महिन्यातील सर्वसाधारण पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. आयएमडीकडून प्रिन्सिपल कम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) आणि मान्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीमनुसार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पावसाच्या हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसापैकी 49 टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो. अल निनोचा प्रभाव कमी भारतीय हवामान विभागाने आपल्या पहिल्या अंदाजात सामान्य पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. यंदा अल निनोचा जोर कमी असेल आणि तो हळूहळू कमी होईल. यंदा सामान्य म्हणजेच पावसाचा अंदाज आहे. यात 5 टक्के पाऊस कमी किंवा जास्त होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले होते. काय आहे अलनिनो?  पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढते या घटनेला अलनिनो म्हटले जाते. ही घटना दक्षिण अमेरिकेतील पेरु या देशाच्या समुद्रकिनारपट्टीवर दिसते. मागील काही वर्षांपासून पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत आहे. अलनिनोमुळे समुद्राच्या वाऱ्यांची दिशा बदलते. परिणामी पर्जन्यक्षेत्रात पाऊस पडत नाही. याउलट ज्या परिसरात पाऊस पडत नाही, तिथे मुसळधार पाऊस पडतो. सरासरी पाऊस म्हणजे किती?  887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो. गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता. देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं. 2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget