मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers),  मिनी अंगणवाडी सेविका आणि मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी शंभर कोटींचा निधी मिळणार आहे. हा शंभर कोटींचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज मान्यता दिली आहे.  


मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मिनी मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे  किंवा मृत्युनंतर देण्यात येणाऱ्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना होणार आहे.






 एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळास  हप्ता देण्यासाठी हा निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



महत्वाच्या बातम्या