ट्रेंडिंग
Maharashtra Weather Update: उष्णतेनं शहरं तापली! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा पारा 41.2 अंशावर; हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather: मार्चच्या पहिल्या आठवड्यातच यवतमाळचा उन्हाचा पारा 41.2 अंशावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मार्च ते मे हे महिना अधिक अवघड जाणार असल्याचे सांगितलं जातंय.
Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. अशातच विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाळ्याच्या (IMD Forecast) सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. तर उष्णतेनं अंगाची लाहीलाही होत असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यातच यवतमाळचा उन्हाचा पारा 41.2 अंशावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मार्च ते मे हे महिना अधिक अवघड जाणार असल्याचे सांगितलं जातंय.
मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा पारा 41.2 अंशावर
मार्च महिन्यातच यवतमाळकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सध्या सूर्य आग ओकू लागला असून शहराचा पारा 41.2 सेल्सिअस अंशावर पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 41 अंशावर पारा हा एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यात जात असतो. मात्र, तपमान 41 अंशावर मार्च महिन्यातच गेल्याने यावर्षी मार्च ते मे महिन्यात तापमान चांगलीच वाढ होण्याचे संकेत आहे. सध्या मार्च महिना सुरू आहे. आणखी एप्रिल मे महिना बाकी आहे. या दोन महिन्यामध्ये पारा 45 ते 46 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी किंवा शेलाचा वापर करावा, तसेच थंड पेय प्यावे जेणेकरून उन्हापासून आपले संरक्षण होईल. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विदर्भातील तापमानाची परिस्थिती काय?
विदर्भ सध्या चांगलाच तापला असून वाशिम 37.6 अंश तर अकोला 37.4 अंशांवर गेलाय. अमरावती 37.2, नागपूर 36.5 चंद्रपुर 36.4 बुलढाणा 34.6 , वर्धा 37.2, गडचिरोली 35.2 इतके तपमान आज (8 मार्च) नोंदवल्या गेलं आहे. मुंबई शहराता 35.3 अंश होते तर ठाण्यात 37.2अंशांवर पारा पोहोचला आहे. येत्या पाचही दिवसात राज्यभरातील तापमान वाढणार असून 11 मार्चपर्यंत उष्णतेची लाट उत्तर व मध्य महाराष्ट्रातही धुळे, नाशिक जिल्ह्यापर्यंत राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. (IMD forecast) हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7-11 मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धूळे, व नाशिक जिल्ह्यात प्रचंड उष्णता वाढणार असून या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि धुळ्यास 11 मार्चला हा अलर्ट आहे. उर्वरित राज्यातही तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सर्वोच्च तापमानाच्या नोंदी होत आहे.
हे ही वाचा