Maharashtra Breaking LIVE Updates: रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 22 May 2025 04:53 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र पर्यटकांचा जीव घेणारे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. तसेच गद्दार हेर ज्योती मल्होत्राला आज...More

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, पावसाचे तीव्र इशारे कुठे कुठे?

फ्लॅश


दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि २३ मे २०२५ च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता आहे 


पुढील ६-७ दिवस पश्चिम किनाऱ्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


२२ ते २४ मे २०२५ रोजी कोकण आणि गोव्यात आणि २४ मे २०२५ रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे


पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल


२२ ते २६ मे २०२५ रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती


२२ आणि २३ मे २०२५ रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा