पुणे: पुणे शहरातील एका गजबजलेल्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली, त्यानंतर एका व्यक्तीने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. या घटनेबाबत पुण्याचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.


आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत


घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त हिंमत जाधव म्हणाले, सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओतील संबंधिताची ओळख पटली आहे, त्यांच्या मागे माझे पोलीस आणि पथक गेले आहेत, आपण त्यांना लवकरच ताब्यात घेऊ. तरुणाच्या आई-वडिलांची अद्याप चौकशी झालेली नाही. याप्रकरणी गुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो सकाळी वाघोलीच्या दिशेने गेला होता. त्याच्या गाडीला आम्ही ट्रेस केलं आहे. मी पुढची माहिती दिली तर मला आरोपीला शोधण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आरोपीचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांची संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.तरूणांनी चौकात लघुशंका अश्लील वर्तन केले आहे. CCTV आधारे नाव निष्पन केले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.


एकाच्या हातात दारूची बाटली दिसत


 नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेत आहोत. आई वडिलांसोबत संपर्क झाला आहे. आरोपींना ताब्यात घ्यायला टिम रवाना झाली आहे. या घटनेबाबत कोणताही दबाव असा नाही. गाडीत दोन जण होते. व्हिडीओ जे लोक दिसत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे सुरु आहे. अर्ध्या तासात गुन्हा दाखल होईल. एकाच्या हातात दारूची बाटली दिसत आहे. आरोपी ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना लवकर ताब्यात घेतलं जाईल. सकाळी ते वाघोलीच्या दिशेने गेला, त्यानंतर पुन्हा माघारी आला होता, पुढचं सांगितले तर आरोपी शोधायला अडचण होईल अशी माहिती देखील हिंमत जाधव यांनी दिली आहे.


तरूणाने मद्य प्रशान केले होते की नाही..


गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरूण अल्पवयीन नाही. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तरूणाने मद्य प्रशान केले होते की नाही, हे ताब्यात घेतल्यानंतर पाहून कारवाई करणार आहोत. पण, सध्यातरी व्हिडिओत बिअरची बाटली दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर काही कलमे लावण्यात आलेली आहेत," अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.