एक्स्प्लोर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक दिग्गजांची गर्दी

गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि अशा महत्वाच्या खात्यांसह तब्बल 22 खाती शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. तर राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणसह 15 खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात सर्वात मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडून मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर टाकण्यात आली आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये अखेर खातेवाटप काल 15 दिवसांनतर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपामध्ये शिवसेनेकडे तगडी खाती आल्याचे दिसत आहे. गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि अशा महत्वाच्या खात्यांसह तब्बल 22 खाती शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. तर राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणसह 15 खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात सर्वात मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडून मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्याकडे गृह आणि नगरविकाससह तब्बल दहा खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुभाष देसाईंकडे कृषि, परिवहन, उद्योग आणि खनिकर्मसह अन्य 11 खाती देण्यात आली आहेत.दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार 23 डिसेंबर रोजी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. विस्तारामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडून इच्छुक नेत्यांची गर्दी आहे. राष्ट्रवादीतून मंत्रिपदासाठी इच्छुक अजित पवार माजी उपमुख्यमंत्री, प्रशासनावर पकड असलेला नेता, मंत्रीपदाचा मोठा अनुभव, राष्ट्रवादी पक्ष आणि आमदारांवर पकड, पण कोणतं खात मिळणार याबाबत अजून ही संभ्रम, गृहमंत्री पदाची हुलकांवणी? दिलीप वळसे पाटील माजी विधानसभा अध्यक्ष, संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव, 15 वर्ष महत्त्वाचा मंत्रीपदावर कामाचा अनुभव, पवारांचे विश्वासू, शांत स्वभावाचे हसन मुश्रीफ कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेतृत्व, अल्पसंख्यांक चेहरा, मंत्रीपदावर कामाचा अनुभव धनंजय मुंडे अजित पवारांचे विश्वासू, विरोधी पक्षनेते म्हणून उमटलेला ठसा, उत्तम वक्ता, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचा पराभव करून नेतृत्व सिद्ध केलं हे ही वाचा - अखेर खातेवाटप जाहीर, सहा मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप, तगडी खाती शिवसेनेकडेच अनिल देशमुख - विदर्भातील नेते, माजी मंत्री, पवारांचे विश्वासू नवाब मलिक मुंबईतील नेतृत्व, पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ, गेले आठ वर्षे प्रवक्ता म्हणून देश आणि राज्य पातळीवर पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली, अल्पसंख्यांक समाजातील चेहरा जितेंद्र आव्हाड - पुरोगामी विचारांचा चेहरा, शरद पवार यांचे विश्वासू, ठाण्यात पक्षाचा चेहरा राजेश टोपे माजी मंत्री, अजित पवारांचे विश्वासू राजेंद्र शिंगणे बाळासाहेब पाटील मकरंद पाटील बबन शिंदे सरोज अहिरे धर्मराव बाबा आत्राम आदिती तटकरे संग्राम जगताप काँग्रेसमधील इच्छुक अशोक चव्हाण - माजी मुख्यमंत्री, प्रशासनाचा अनुभव, विविध खात्यांचा कारभार सांभाळण्याचा अनुभव पृथ्वीराज चव्हाण - माजी मुख्यमंत्री, दिल्ली आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये कामाचा अनुभव, उच्चशिक्षित यशोमती ठाकूर - काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, विदर्भातील फायरब्रॅंड नेत्या, आक्रमक महिला चेहरा विश्वजित कदम - पंतराव कदम यांचे सुपुत्र, सहकार क्षेत्रात मोठं जाळं, सांगली पुरात उल्लेखनीय काम, काँग्रेस कार्याध्यक्ष विजय वडेट्टीवार - विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, आक्रमक नेतृत्व, चंद्रपुरात पक्षाला यश मिळवून दिलं के.सी.पाडवी काँग्रेस कार्याध्यक्ष, आदिवासी चेहरा सतेज पाटील माजी मंत्री, स्वच्छ प्रतिमा, भाजप कोल्हापूर मुक्त करण्यात मोठी भूमिका, पडत्या काळात पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात यश मिळवून दिलं वर्षा गायकवाड - दलित चेहरा, माजी मंत्री, काँग्रेसशी एकनिष्ठ घराणं, महिला नेतृत्व, मुंबईत पक्षाला स्थान मिळवून देणारा चेहरा अमित देशमुख - माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा, माजी मंत्री, लातूरमध्ये पक्षाला बळकटी देण्याचं काम सुनील केदार - विदर्भातील आक्रमक चेहरा, काँग्रेस नेतृत्वशी एकनिष्ठ, ज्येष्ठ आमदार अमीन पटेल - मुंबईतील अल्पसंख्यांक चेहरा, स्वच्छ प्रतिमा नसीम खान (निवडणुकीत हरले आहेत, पण इच्छुक आहेत) - अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय, निवडणुकीत हरले तरी इच्छुक, मुंबईतील अल्पसंख्यांक चेहरा, माजी मंत्री प्रणिती शिंदे -माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या, तिसऱ्यांदा आमदार, युवा महिला नेतृत्व
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget