एक्स्प्लोर

मरेल, जेलमध्ये जाईल पण स्वाभिमान गमवणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा

रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा वापर करून वाटेल ते केलं असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

 harshvardhan jadhav on raosaheb danve: माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद काही नवीन नाही. त्यातच आता दानवे यांनी आपल्यावर  अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. तर आपल्याला मारून टाकले किंवा जेलमध्ये सुद्धा टाकले तरीही स्वाभिमान कधीच गमवणार नाही,असा इशारा जाधव यांनी दानवे यांना दिला आहे. याबाबत जाधव यांनी एक व्हिडिओ जारी केला असून, त्यातून त्यांनी दानवे यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. 

जाधव यांनी पोस्त केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटल आहे की, रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मला त्यांना एकच सांगायचं आहे, यावर न्यायालयात जे काय व्हायचं ते होणारच आहे. सगळं काही विषय न्यायालयात येणारच आहे. पण आपल्याला जर वाटत असेल की, हर्षवर्धन झुकेल आणि आपल्या पायाशी लोटांगण घेईल तर असे होणार नाही. त्यामुळे मी मरण पसंद करील, जेलमध्ये जायला तयार आहे, पण स्वाभिमान कधीच गमवणार नाही. आपण मंत्री आहात, मोठ्या पदावर आहात, वाटेल ते केलं आहे आणि करणार आहात. मला सगळं माहित आहे. पण स्वाभिमानाचा झेंडा मी कधीच सोडणार नाही. आम्हीपण लखोजी जाधवांचे वंशच आहोत सोपं नाही,असं जाधव म्हणाले आहेत. 

दानवेंवर गंभीर आरोप... 

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. जाधव यांच्याकडून दानवे यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आले. मात्र दानवे सहसा या सर्व प्रकरणावर किंवा जाधव यांच्या आरोपांवर बोलण्यास टाळतात. गेल्या काही वर्षांपासून हर्षवर्धन व त्यांची पत्नी या वेगवेगळे राहतात. मात्र त्यांच्या मुलगा आदित्य आपल्या वडीलांसोबत राहतो. तर आपली संपती मुलगा आदित्याच्या नावावर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पण नातावाच्या नावावर संपती होऊ नयेत म्हणून, दानवे यांच्याकडून विरोध होत असल्याच जाधवांकडून सांगण्यात आले आहे. 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget