रायगड : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता उरण विधानसभा मतदारसंघातून (Uran Assembly Constituency) मोठी बातमी समोर येत आहे. मविआचे उमेदवार मनोहर भोईर (Manohar Bhoir) यांना काँग्रेसने (Congress) पाठींबा दिला आहे. यामुळे भाजपचे महेश बालदी (Mahesh Baldi) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले होते. महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही घटक पक्षांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले. त्यामुळे उरण विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या जागावाटपात रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी काँग्रेसला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मागील आठवड्यात 250 पदाधिकाऱ्यांसमवेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मनोहर भोईर यांना काँग्रेसचा पाठिंबा
अखेर उरण विधानसभा मतदारसंघातील मविआचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांना आता काँग्रेसने जाहीर पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे आता मनोहर भोईर यांचे पारडे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भक्कम झाले आहे. आता त्यांची लढत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रितम म्हात्रे आणि भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्यासोबत सोबत होणार आहे. या तिरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी
दरम्यान, धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत आहे. माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांचे समर्थक झालेत. पक्षाने अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. या प्रचारात मधुकर चव्हाण सहभागी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या