Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो
बावनुकळे यांनी म्हटलं आहे की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाविकास आघाडीची जाहीर सभा यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदान कोणाला आणि का द्यायचे, कोणत्या विचारसरणीला मतदान करायचे हेही महत्त्वाचे आहे. आम्ही बुधवारी महाविकास आघाडीच्या 5 हमीबद्दल सांगितले होते. आज (7 नोव्हेंबर) आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. या जाहीरनाम्यात, आम्ही नमूद केलेल्या 5 हमींमध्ये आम्ही आणखी काही योजना जोडत आहोत. आम्ही लवकरच महाविकास आघाडीचा तपशीलवार जाहीरनामा देखील लॉन्च करू, असे त्यांनी सांगितले.
धारावीतून संपूर्ण मुंबई गिळंकृत करण्याचा डाव असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हे षड्यंत्र थांबवायचे आहे. मुंबईतील हजारो एकर जमीन अदानीला देण्यात आली आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ही निविदा रद्द करू. धारावीत नवीन वित्त केंद्र बांधणार आहोत. महाराष्ट्राच्या सुपुत्रांसाठी नोकऱ्यांची व्यवस्था करू. आम्ही मुलांबरोबरच मुलींनाही मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करू. आम्ही फक्त तेच वचन देतो जे आम्ही पूर्ण करु शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या