एक्स्प्लोर

ऊस गाळप हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार

साखर संघ आणि विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्व स्तरावर आढावा घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबई: राज्यातील ऊस गाळप हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. साखर संघ आणि विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्व स्तरावर आढावा घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजन या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2018-19 बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. साखर संघाच्या शिफारशी तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि राज्य सहकारी बँकेच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारचे धोरण आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करुन आढावा घेऊन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी राज्यातील साखर उद्योगासंदर्भात सविस्तर माहिती दिली. गतवर्षी संपूर्ण देशात 321.03 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 107.10 लाख टन आहेत. गाळप हंगाम 2018-19 साठी जाहीर एफआरपी दर हा 10 टक्के बेसिक साखर उताऱ्यासाठी प्रती क्विंटल 275 रुपये असून 10 टक्क्यांपुढे 0.1 टक्के उताऱ्यासाठी प्रती क्विंटल 2.75 रुपये आहे. तसेच 10 टक्क्यांपेक्षा कमी आणि 9.50 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल तर 0.1 टक्क्यासाठी 2.75 रुपये प्रती क्विंटल व 9.50 किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रती क्विंटल 261.25 रुपये केंद्र शासनाने 20 जुलै 2018 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इसेंनशिअल कमोडिटीज् ॲक्ट 1955 अंतर्गत शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार साखर दर निश्चिती 2900 रुपये क्विंटल अशी केंद्र शासनाने ठेवली व साखरेवर जीएसटी 5 टक्के ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत आमदार अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे यांनी साखर संघाच्या विविध मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सहकार विभागाचे सचिव आभा शुक्ला, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 October 2026: आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका, 'पुणे शिक्षक'साठी भाजपच्या विरोधात बंडखोराला पाठिंबा जाहीर
मोठी बातमी! अमरावतीतील उट्टे शिवसेना पुण्यात काढणार, 'पुणे शिक्षक'साठी बंडखोर उमेदवाराला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget