सोलापूर : सोलापूरकरांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. बहुप्रतीक्षित सोलापूर विमानतळाला (Solapur Airport) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून लायसन्स मंजूर झाले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिनांक 11 आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी आणि तपासणी केली होती. यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणाली द्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीए कडून करण्यात आलेली होती. परिणामी, विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणकडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे, आज (25सप्टेंबर रोजी) डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे आणि उतरण्याचे परवाना (लायसन्स) मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.


विमानसेवा सुरू होण्याच्या प्रक्रियेला वेग 


तत्पूर्वी ब्युरो ऑफ सिविल एव्हिजन सिक्युरिटी (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) च्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली होती. विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते. त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती. तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीएकडून सोलापूर विमानतळाला आज विमान लँड होणे आणि टेकऑफ करण्याची लायसन्स प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. 


बनावट तिकिटाद्वारे पुण्याहून लखनौला जाण्याचा डाव फसला


पुणे येथील विमानतळावरून बनावट तिकिटांच्या (Fake Tickets) माध्यमातून इंडिगोच्या (Indigo) विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी (Police) जेरबंद केले आहे. सलीम खान (Salim Khan) आणि नसीरुद्दीन खान (Nasiruddin Khan), अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सलीम खान आणि नसीरुद्दीन खान हे दोघे बनावट तिकिटांच्या मदतीने इंडिगोच्या विमानाने उड्डाण करून लखनऊला जाण्याच्या तयारीत होते. बनावट तिकीटाच्या माध्यमातून त्यांनी विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न देखील केला. 


पुणे विमानतळावर दोघांना बेड्या


ते विमानात चढण्याचा प्रयत्न करताना एअरपोर्ट विभागाला तिकिटे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे दहशतवादी कनेक्शन आहे का? याबाबत तपास सुरु केला आहे. मात्र यामुळे पुणे विमानतळावर एकच उडाली आहे. बनावट तिकीट घेऊन उड्डाण करण्यामागील त्यांचा हेतू नेमका काय होता? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.


हे ही वाचा