मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बीगिन अगेन अंतर्गत आता विविध विभागांना लोकलने मुंबईत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता वकिलांना देखील मुंबईत लोकलने प्रवास करण्याची अखेर मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रवास करताना वेळेचे बंधन असणार आहे.


वकिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा


मुंबईत लोकलने प्रवास करण्याची अखेर मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रवास करताना वेळेचे बंधन असणार आहे. सकाळी लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटची लोकल असेपर्यंत प्रवासास मुभा असणार आहे. गर्दीच्या वेळी वकिलांना प्रवास करता येणार नाही. मासिक पासही मिळणार नाही, प्रत्येक प्रवासासाठी जाताना आणि येताना वेगवेगळे तिकीट काढावे लागणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अधिकृत ओळखपत्रावरच तिकीट मिळणार आहे. अधिकृत कामासाठीच प्रवास करता येणार आहे, खाजगी कामासाठी प्रवास करता येणार नाही. लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी यासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वकील आणि त्यांच्याकडील नोंदणीकृत कारकून लोकलने प्रवास करू शकणार आहेत.


कोलकाता मेट्रोमधील कलर कोड सिस्टीम, मुंबई लोकलमध्ये? काय आहे कलर कोड सिस्टीम?


खाजगी सुरक्षारक्षकांनीही प्रवासाची मुभा
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी देखील आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती. खाजगी सुरक्षा रक्षकांचे होत असलेले हाल एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर आज खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आता गांभीर्याने केला जातोय. मात्र गर्दी नियंत्रणात असावी यासाठी कोलकाता येथील मेट्रो प्रमाणे कलर कोड सिस्टीम राबवण्याचा विचार सध्या केला जातोय.


काय आहे कलर कोड ई पास यंत्रणा?
ज्यावेळेस कोलकातामध्ये सहा महिन्यांच्या मेट्रो रेल्वे सुरू करायची होती त्यावेळेस अतिशय हटके सिस्टीम राबवण्याचा विचार केला गेला. मेट्रो मधील गर्दी कमी करण्यासाठी कलर कोड असलेला ई पास देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी एक नवी यंत्रणा निर्माण केली गेली. कोलकाता मेट्रोमधून जर प्रवास करायचा असेल तर आधी तुम्हाला ईपास घ्यावा लागेल. हा पास मेट्रो रेल्वेचे अॅप, मेट्रो रेल्वेची वेबसाईट यावर उपलब्ध असेल. मात्र त्याला देखील वेळ मर्यादा आहे. तुम्हाला जी ट्रेन पकडायची आहे. त्या ट्रेनच्या वेळेच्या 12 तास आधीपासून हा पास काढता येईल. हा ई पास म्हणजे तिकीट नसून केवळ एक क्यू आर कोड होता. ज्या क्यू आर कोडला प्रत्येक तासाला वेगळा कलर दिला जातो. त्यामुळे ज्याने ज्या वेळेत ट्रेनचा ई पास काढलाय, त्याच वेळेत त्याला प्रवास करता येईल, अन्यथा नाही. स्टेशनवर उभा असलेला अधिकारी प्रवाशाच्या पासचा रंग पाहतो आणि त्याला आत मध्ये प्रवेश देतो.


Vijay Wadettiwar | दोन- तीन दिवसात लोकल सर्वांसाठी सुरु करण्याबाबत निर्णय : विजय वडेट्टीवार