Pulses Rate Increase : मागील काही दिवसांत नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. तर, किराणा मालाच्या सर्व वस्तूंची भाव वाढत आहेत. त्यातच डाळीमध्ये असणारी गेल्या वर्षीची तूट यावर्षी अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळीची भाव (Pulses Rate) वाढ निश्चित आहे. गेल्या वर्षी पाच लाख टन तुर डाळीची तूट होती. यावर्षी चार लाखाची तुट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम भाव वाढीवर होण्याची शक्यता आहे.


सलग दुसऱ्या वर्षी डाळींची स्थिती बिकट झाली आहे. पेरणीचा पारंपरिक हंगाम 15 जून ते 15 जुलै संपल्यानंतर ही जुलैअखेरपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. मात्र, असे असताना सध्या देशभरात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरण्यांमध्ये 9 टक्क्यांची तूट आहे. यामुळेच प्रामुख्याने तूरडाळीची 5 लाख टनांची तूट असताना त्यात 4 लाख टनांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही स्थिती समोर आली आहे.


भारतात दरवर्षी सर्व प्रकारच्या डाळींचे उत्पादन 120 ते 122 लाख टनांच्या आसपास असते. त्या तुलनेत मागणी 126 ते 128 लाख टन असते. उडीद व मूग वगळता उर्वरित डाळींसाठीचे पीक हे फक्त खरिपात घेतले जाते. या डाळी दिवाळीनंतर बाजारात येतात. डाळींच्या एकूण मागणीत सर्वाधिक 42 ते 44 लाख टन तूरडाळीचा समावेश असतो. या तुलनेत उत्पादनदेखील जवळपास तितकेच असते. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस अनेकदा तूरडाळ आयात केली जाते. तीच वेळ आता आली आहे.


डाळींची परिस्थिती 



  • देशभरातील पेरणी क्षेत्रात 9 टक्क्यांची घट

  • सर्वाधिक मागणीच्या तुरीची तूट 7 टक्क्यांवर

  • पाच लाख टनांच्या तुटीत आणखी 4 लाख टनांची भर


सरकारकडून आयात धोरण...


डाळींच्या पेरण्यांमध्ये घट झाल्याने याचा परिणाम बाजारवर झाला आहे. येत्या काळात भाव वाढत जाणार असल्यामुळे सरकार आता आयात धोरण स्वीकारत आहे. मात्र, जागतिक बाजारात ही उत्पादन कमी झाल्यामुळे भाव वाढीवर किती नियंत्रण मिलले ते सद्या सांगता येत नाही. तर, बदललेली पाऊसमान, पीक पद्धती, याचा थेट परिणाम तुरदाळीच्या उत्पन्नावर होत आहे. मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्यामुळे त्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. 


किचनचं बजेट बिघडणार... 


प्रत्यके घरातील किचनमध्ये डाळीची मागणी असतेच. फक्त त्या कमीअधिक प्रमाणात असू शकते. विशेष म्हणजे तुरीच्या डाळीची मागणी अधिकच असते. सहसा वरणासाठी तूरडाळच वापरली जाते. त्यामुळे वाढत्या डाळीच्या किमतीचा फटका सर्वसामन्य नागरिकांना देखील बसणार आहे. तर यामुळे किचनचं बजेट बिघडणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Toor Dal Price: तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! शेतकऱ्यांना अच्छे दिन; मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री