लातूर : बदलापूरमधील शाळेत (Badlapur School Case) दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. बदलापूरच्या शाळेत 13 ऑगस्ट रोजी नर्सरीतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. या घटनेचे पडसाद बदलापूरसह संपूर्ण राज्यभरात उमटले. तसेच मागील काही दिवसात महिला मुलींवरील अत्याचाराच्या अनेक समोर आल्या आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महिला, मुलींवर अत्याचार मनाला वेदना देणाऱ्या : पंकजा मुंडे
महिला, मुलींवर अत्याचार, बलात्कार, हत्या या घटना मनाला अतिशय वेदना देणाऱ्या आहेत. मुलीला जगायचं असतं, तिचे काहीतरी स्वप्न असतात आणि कोणीतरी एक नराधम तिचे स्वप्न पूर्णपणे विस्कटून टाकतो. हे अत्यंत भयानक आहे. या विषयावर कुठेही राजकीय भूमिका व्यक्त करणे हे अत्यंत चुकीचे आहे. महिला-मुलींचं जीवन हीरावून घेणाऱ्या नराधमांना चौकामध्ये आणून शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच, सध्या अनेक विषय फास्टट्रॅक कोर्टात गेलेले आहेत. त्या लोकांवर कारवाई होईल, असा मला विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंकजा मुंडे संभाजी पाटील निलंगेकरांच्या जनसन्मान पदयात्रेत सहभागी
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी लातूर येथे जनसन्मान पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. निलंगा मतदार संघाचे भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी पंकजा मुंढे वलांडी येथे आल्या होत्या. संभाजी पाटील निलंगेकर हे या यात्रेच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघात तीनशे किलोमीटर अंतर पार करणार आहे. मतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही जन सन्मान पदयात्रा काढली आहे. पद यात्रेत सहभाग घेतल्यानंतर वलांडी येथील जाहीर सभेसाठी पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून फेक नरेटीव सेट करण्यात त्यांना यश मिळालं होतं यामुळे आता आम्ही जनतेत जाऊन केलेल्या विकास कामाच्या माहिती जनतेपर्यंत घेत आहोत. त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Pankaja Munde: कोणाला कुठल्या मतदारसंघातून, कुठल्या पक्षातून तिकीट मिळणार? पंकजा मुंडे म्हणाल्या...