Latu Fire News : लातूर जिल्ह्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फुड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 40 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देवणी, शिरुरअनंतपाळ आणि लातूर इथून अग्निशमाक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. पण नेमकी आग कशामुळं लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फुड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट कारखान्यात आज दुपारच्या वेळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील बग्यास, मोटार आणि वायरींग जळून खाक झाले असून, जवळपास 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, लातूर , शिरूर अनंतपाळ आणि देवणी येथील अग्नीशामक दलाच्या गाड्याच्या मदतीने वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. व्हिक्टोरिया ॲग्रो फुड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात धान्यापासून अल्कोहोल तयार करण्यात येते. अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या साहित्य जळून खाक झाला आहे. मात्र, ही आग कोणत्या कारणामुळं लागली हा अपघात आहे की घातपात आहे हे स्पष्ट झालेलं नाही. शिरुर अनंतपाळ येथील पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
महत्वाच्या बातम्या: