Latur Crime News : लातूर (Latur) हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र, ही ओळख आता बदलते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, भर दुपारी भर रस्त्यावर एका युवकाला सात ते आठ लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
काय आहे प्रकरण?
लातूरच्या ट्युशन एरियातून तयार झालेले छोटे-मोठे दादा टोळी तयार करुन काय करु शकतात याचा प्रत्यय लातूरकरांना आला आहे. आकाश होदाडे, आशिष रेड्डी, अक्षय कोद्रे यांची टोळी आहे. या टोळीचा वाद अजिंक्य मुळे नितीन भालके अक्षय कांबळे यांच्या टोळीशी होता. यांच्यात कायमच भांडणे मारामाऱ्या होत होत्या. ही भांडणं मिटावी यासाठी दोन्ही टोळीचे लोक राजश्री हॉटेलमध्ये एकत्र आले होते. या ठिकाणी 15 ते 17 जण दारु पिले होते. त्यांचे सात हजारापेक्षा अधिकच बिल झाले होते. यावेळी बाहेर पडताना एकाने दुसऱ्याला चापट मारली आणि येथूनच भांडणाला सुरुवात झाली. अजय चिंचोले या तरुणाला अजिंक्य मुळे ,नितीन भालके ,अक्षय कांबळे, जगताप ,प्रणव संधीकर सोहेल यांनी हॉटेल बाहेर आणले. या ठिकाणी अतिशय अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. यामुळं लातूर आंबेजोगाई रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. अनेकांनी याचे व्हिडिओ देखील बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.
मारहाण करणाऱ्यांची पोलिसांनी पोलीस ठाण्यापर्यंत मारत काढली वरात
पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस ठाणे गांधी चौक पोलीस ठाण्यातील पथक कार्यान्वित झाली. तीन तासांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली. ऋषिकेश सोनटक्के बालाजी जगताप अजिंक्य मुळे अक्षय कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ज्या ठिकाणी यांनी मारहाण केली होती त्या ठिकाणापासून पोलीस ठाण्यापर्यंत मारत यांची वरात काढण्यात आली. यावरच प्रकरण संपेल असा विषय नाही या मागचं कारण आहे. यातील सर्व लोक हे गुन्हेगारी वृत्तीचे आहे
अनेकांवर पहिले गुन्हे दाखल
आकाश होदाडेवर 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. तसेच अक्षय कोद्रेवर दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. फरार आरोपी अनेक गुन्हात पोलिस त्याचा तपास करत आहेत. आशिष रेड्डीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. हे लोक पळून गेले आहेत. अजय चिंचोले जखमी असून, यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. मारणाऱ्या टोळीमधील अक्षय कांबळेवर दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. अजिंक्य मुळे हा पाच दिवसापूर्वी जेलमधून बाहेर पडला होता. त्याच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. नितीन भालकेवर 15 गुन्हे दाखल आहेत. जगताप, प्रणव संदीकर आणि सोहेल यांच्यावरही काही गुन्हे दाखल झाले आहेत..
90 टक्के गुन्हेगार लातूरच्या ट्युशन एरियामध्ये दादागिरी करतात
यातील जवळपास 90 टक्के गुन्हेगार लातूरच्या ट्युशन एरियामध्ये छोटी मोठी दादागिरी करत मोठी झाली आहेत. यांच्याकडे हत्यारे आहेत. गैरमार्गाने आणलल्या पिस्तूल आहेत. यांच्यावर दहापेक्षा अधिक गुन्हे आहेत. शेतीचा प्लॉटचा कब्जा करणे. पैशासाठी लोकांना मारहाण करणे धमकी देणे. सुपारी घेऊन एखाद्याला मारणे असे सर्व प्रकार हे लोक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime News: पुण्यातील यवतमध्ये घरावर चड्डी-बनियानवर जाऊन दरोडा, तरुण मुलाला वार संपवलं; तिघांवर वार केले अन्..., मध्यरात्री नेमकं काय घडलं?