Latur News:  मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. भारत सरकारचा अंगिकृत उपक्रम असलेल्या रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांच्या संयुक्त माध्यमातून वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे. तर या दोन कंपन्यांसोबत करार करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात निश्चित करण्यात आलेल्या 200 पैकी 120 वंदे भारत रेल्वे गाड्या या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात तयार होणार असून, उर्वरित 80 रेल्वेगाड्या या चेन्नई येथे उत्पादित होणार आहे. 


मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. दरम्यान आता या प्रक्रियेला वेगही आला असून, मराठवाडा रेल्वे कोच कारखाना चालवायला घेण्यासाठीच्या निविदा प्रकिया अंतिम टप्प्यात असल्याचे समोर आले आहे. या प्रक्रियेत भाग घेऊन सर्वांत कमी बोली सांगणारी कंपनी म्हणून रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्या प्रथमच पुढे आल्या आहेत. या दोन कंपन्यांसोबत करार करण्यासंबंधीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे लवकरच लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात वंदे भारत रेल्वे गाड्या तयार होणार आहेत. तर वर्षाला 1920 रेल्वे बोगी वर्षाला तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 


लातूरमध्ये 120 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार होणार 


मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लवकरात लवकर सुरुवात करावा अशी मागणी होत असताना, याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखाना चालवायला घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कपन्यांनी सर्वांत कमी बोलावली होती. त्यामुळे या दोन कंपन्यांसोबत करार करण्यासंबंधीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तर निश्चित करण्यात आलेल्या 200 पैकी 120 वंदे भारत रेल्वे गाड्या या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात तयार होणार आहेत. तर, उर्वरित 80 रेल्वेगाड्या या चेन्नई येथे होणार आहेत. 


अशी असणार वंदे भारत रेल्वे 


तर वंदे भारत रेल्वेच्या सर्व बोगी या स्टीलमध्ये बनवण्यात येणार आहेत. ही गाडी हाय स्पीड असून ज्यामध्ये 16 सेल्फ प्रोफेल्ड कोच आहेत. विशेष म्हणजे, तिला वेगळ्या इंजिनची आवश्यकता असणार नाही. या रेल्वे गाड्या वातानुकूलित असून जिवाणू विरोधी प्रणाली यामध्ये असणार आहे. 140 सेकंदात 160 किमी ताशी वेग घेण्याची क्षमता या गाड्यांमध्ये असणार आहे. त्यामुळे लवकरच हा कारखाना सुरुवात होऊन यामधून रेल्वे बोगी तयार होऊन बाहेर पडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur: पोलिस ठाण्यात रील अन् भावानं केली हवा... नंतर पोलिसांनी काढली त्याचीच 'हवा'; लोक म्हणाले, फरक दिखता है!