Latur Crime News: लातूरमध्ये (Latur) एक धक्कादायक घटना समोर आली असून, भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गांधी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरात झोपेत असलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत गांधी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  हा वृद्ध भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करायचा. तसेच लातुरात बसस्थानक परिसरातील गांधी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये तो रात्रीच्या वेळी झोपायचा.  दरम्यान शनिवारी देखील तो रात्रीच्या वेळी  तो गांधी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये झोपी गेला होता. यावेळी तिथे एक 23 वर्षीय तरुण पोहचला. या तरुणाने वृद्धाकडे पैसे असतील म्हणून त्यांचे खिसे तपासले. 


बसस्थानक परिसरातील गांधी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये झोपलेल्या वृद्धाच्या खिशात पैसेच नसल्याने तरुण चिडला आणि रागाच्या भरात त्याने वृद्धाच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तेथून निघून गेला. तर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळच्या सुमरास ही घटना समोर आली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी सुनील गोसावी यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी संशयित अविनाश धनाजी चव्हाण (वय 23 वर्षे) याला अटक केली आहे.  तसेच पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी सुरु आहे. 


विटा टाकण्यावरून डोक्यात दगड घातला


दरम्यान दुसऱ्या एका घटनेत, घराजवळ विटा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून एकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत देवणी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्याम गंगाधर बिरादार (वय 20 वर्षे रा. येणकी, ता.उदगीर) यांना घराजवळ विटा टाकण्याच्या कारणावरून शिवाजी दिगंबर बिरादार याच्यासह सोबतच्या अन्य दोघांनी संगनमत करून डोक्यात मारून जखमी केले, शिवाय अन्य एकाने साक्षीदाराच्या डोक्यात दगड घातला. आई-वडील भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याबाबत देवणी पोलिस ठाण्यात शिवाजी बिरादार याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Latur Accident : बेशिस्त वाहन चालकांमुळे लातूरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, दोघांवर गुन्हा दाखल