लातूर: लातूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या अभय भुतडा या इसमाने राहत्या घरात आपल्या सहा वर्षाच्या मुलीला फाशी देऊन नंतर स्वत: घरातील सिलिंग फॅनला फाशी घेत आयुष्य संपवले आहे. मार्केट यार्ड येथील गेट नंबर चार जवळ मोतीनगरचा परिसर आहे. या भागातील ’रामकाशी’ या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर अभय भुतडा हे भाड्याच्या घरात राहत होते. 36 वर्षीय अभय भुतडा (Abhay Bhutda) हे हॉटेल व्यवसायिक होते. त्यांची पत्नी घराशेजारील माहेरी गेली होती. मुलीला नाश्ता देऊन शाळेला सोडून येतो, असं सांगून त्यांनी हॉटेल सोडलं होते. मात्र, काही काळानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. अभय पुतळा यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या लेकीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्यांनी फॅनला गळफास घेत आत्महत्या केलीचे समोर आले.


घटनेची माहिती कळताच या भागातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अभय पुतळा यांनी आपल्या मुलीचा खून का केला त्यांनी आत्महत्या का केली? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. गांधी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपास करत आहे. अभय भुतडा यांचं याच भागामध्ये इडली आणि चहाच हॉटेल होते. त्यांच्या सहा वर्षांच्या चुणचणीत मुलीचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभय भुतडा यांनी कौटुंबिक कलाहातून का आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली याबाबत अद्याप ठोस कोणतीही माहिती समोर आली नाही.


आणखी वाचा


फुटलेली कवटी अन् रक्तबंबाळ शरीर, कुत्र्याची निर्घृण हत्या; आरोपीला फक्त 50 रुपयांत जामीन


पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; पतीला अटक