लातूर: लातूर (Latur News) जिल्ह्यातील शिरूर  ताजबंद  गावात असलेल्या एटीएम सेंटरमधील (ATM Center)  एटीएम मशिनच चोरटे उचलून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मशिनमध्ये तब्बल 27 लाख रुपायांची रोकड होती. या प्रकरणी गुन्हा दाखल (Case Registerd)  करण्या आला असून पोलीस तपास करत आहे. नांदेड-बिदर मार्गावरील (Nanded Bidar)  शिरूर ताजबंद येथे हा प्रकार घडला आहे.


लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद  गावात  चोरट्यांनी 27 लाखांसह एटीएम मशीनच पळवली.   या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या आला असून पोलीस तपास करत आहे. तपासासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  एटीएम मशीनला (ATM)  तारेचा फास टाकून ती उखडून तब्ब्ल 27 लाखांसह मशीनच एका चारचाकी वाहनातून पळवण्यात आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएम चोरी प्रकरणात पोलिसांकडून वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. 


एटीएमची काच फोडून मशीनसह रोकड  लंपास


दरम्यान चोरट्यांच्या अटकेसाठी चार पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील नांदेड-बिदर महामार्गालगत एका कॉम्प्लेक्समधे ही एटीएम मशीन होती.संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम होते.  सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या एटीएमला सुरक्षा रक्षक नव्हते.  पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार भर वस्तीत एटीएमची काच फोडून मशीनसह रोकड लंपास केली.  एटीएम सेंटरबाहेर सुरक्षारक्षकही नव्हता. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडली आहे. 


कंपन्यांचा हलगर्जीपणा!


शहरातील एटीएमची जबाबदारी वेगवेगळ्या खाजगी कंपनीकडे बँकेकडून देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील अनेक एटीएम रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नाही, काही ठिकाणी चांगली अलार्म यंत्रणाच नाही. असे काही एटीएम आहेत ज्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील सुरु नाहीत. त्यामुळे अशाच एटीएमची पाहणी करून चोर त्यांना टार्गेट करतात. त्यामुळे कंपन्यांचा हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडतांना अनेकदा समोर आले आहेत. मात्र, याचा बोझा पोलीस यंत्रणेवर पडतो. 


हे ही वाचा :


ATM Withdrawal : एटीएममधून पैसे निघाले नाहीत पण खात्यातून रक्कम कापली गेली? अशी मिळवा तुमची रक्कम