लातूर: महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सोडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष विश्वासार्ह नाहीत असं म्हणत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) थेट शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. प्रकाश आंबेडकर हे आज लातूरमध्ये बोलत होते. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणातील पार्टीचा महाराष्ट्रात शिरकाव होत असल्याचंही ते म्हणाले. 


महाविकास आघाडीत वंचितच्या डॉ. प्रकार आंबेडकरांना शिवसेना फेवरेबल आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विरोध होत असल्याचं चित्र आहे. त्यावरुन आता प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य (Prakash Ambedkar On Uddhav Thackeray And Sharad Pawar) केलं आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये तेलंगणाच्या पक्षाचा शिरकाव होतोय. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत आता नागपूरची सभेची तयारी केली. नऊ वर्षे जनतेच्या मनामध्ये राग आहे. तो राग मतात परावर्तीत करत मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न होतोय. उद्धव ठाकरे जर सोडले तर महाविकास आघाडीतील दोन पक्षाची विश्वासार्हता काय आहे हे सर्वांना माहीत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर जाणार होतो, मात्र जागावाटपात किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट होत नाही. तिन्ही पक्षांनी त्याचं काय ठरलं असेल तर ते स्पष्ट करावं."


भाजपा जातीय ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar On BJP) केला आहे. मुस्लिम समाजाने नऊ वर्षे जे सोसले आहेत ते आणखीन सहा महिने सोसावं, जातीय सलोखा बिघडू नये असं काम करावं. देशात कर्नाटकसारखा निकाल येऊ शकतो. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "हिजाब, लव्ह जिहाद सारखे बारा तेरा प्रकरण मागील काही दिवसात काढण्यात आली आहेत. असे अनेक प्रकार भविष्यात ही केले जातील. हे जातीय तेढ निर्माण करणारे आहे. मुस्लिम समाजाने नऊ वर्ष हे पाहिले आहे, आणखीन सहा-सात महिने पाहा. जातीय सलोखा कायम राखत एकत्र आल्यास कर्नाटकसारखे देशात सत्ता परिवर्तन होऊ शकते."


 भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरील अजेंडे संपले आहेत. त्यामुळं आता समाजात भीती निर्माण करणे आणि जातीय ध्रुवीकरण करत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी धडपड चालू असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं.


ही बातमी वाचा :