लातूर:  लातूर (Latur News) काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या खून प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे.  कल्पना गिरी यांची हत्या मार्च 2014 मध्ये झाली होती. 2014 ची संपूर्ण निवडणूक या मुद्याभोवती फिरत होती. अशा या बहुचर्चित खून प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे अनेक जणांचे लक्ष निकाल काय लागणार याकडे आहे.


काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता असलेल्या कल्पना गिरी यांचा खून त्यांच्याच पक्षातील इतर सहकाऱ्यांनी केला होता. यामुळे पक्षांतर्गत राजकारण ,महिला पदाधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व या सर्व बाबीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कल्पना गिरी यांचा खून प्रकरणाचा तपास अद्याप ही पूर्ण झाला नसल्याची तक्रार गिरी कुटुंब सातत्याने करत असतात. 2014 च्या निवडणुकीत हे प्रकरण अतिशय गाजलं होतं. काँग्रेस आणि काँग्रेसची ध्येयधोरण, महिलांची काँग्रेस मधील स्थान याचं मूल्यमापन या प्रकरणावरून विरोधी पक्षांना सातत्याने करत हाच निवडणुकीचा मुद्दा केला होता.


कोण होत्या कल्पना गिरी ?



  •  कल्पना गिरी या लातूर शहर विधानसभा युवक  कॉंग्रेस सरचिटणीस होत्या

  • 28 वर्षीय कल्पना गिरी या सात वर्षापासून सामाजिक कार्यत सक्रिय होत्या

  • युवक काँग्रेसमध्ये आल्यानंतर अल्पावधीत त्या लातूर शहर विधानसभा युवक  काँग्रेस सरचिटणीस म्हणून निवडून आल्या

  • एल एल बी चे शिक्षण पूर्ण झाले होते. वकिली व्यवसाय सुरु करणार होत्या.

  • कल्पना गिरी एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षा देण्याच्या तयारीत होत्या 

  • तरूण आणि होतकरू असलेल्या कल्पना यांना पक्षातून मोठा विरोध होता .

  •  या मुळे त्यांचा घात झाल्याचा आरोप कल्पनाच्या कुटुंबियांनी केला आहे.



काय झाले होते …?


 कल्पना गिरी  यांचा मृतदेह तुळजापूर जवळच्या तलावात आढळून आला होता.अपहरण  आणि बलात्कारानंतर  कल्पनाचा खून करण्यात आल्याचा तिच्या नातेवाईकांनी आरोप  केला होता. याशिवाय तिच्या मृत्यू  मागे युवक काँग्रेसचेच पदाधिकारी असल्याचेही तिच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं होते.त्यानंतर पोलीसांनी मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा राबवली. कल्पनाच्या मारेक-यांना अटक करावी या मागणीसाठी  लातूरचे वातावरण तापले होते. पोलिसांनी यात महेंद्रसिंह चौहान आणि  समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली होती. यापैकी महेंद्रसिंह चौहान हा युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष आहे. तर समीर किल्लारीकर  सदस्य आहे. समीर किल्लारीकर याने कबुली जबाब दिला आहे की महेंद्रसिंग चौहान आणि कल्पना याचे त्या दिवशी वाद झाला होता. महेंद्रसिंग चौहान याचे कल्पनापासून फटकून वागणे कल्पनास आवडत नव्हते . तुळजापूर जवळील तलावात कल्पनास ढकलून तिचा खून करण्यात आला .


कल्पनाने  युवक काँग्रेसची निवडणूक लढवू नये असा आरोपींचा आग्रह होता मात्र तिने या निवडणुकीत  सहभाग घेतल्याने  तिला युवक काँग्रेसचे हे पदाधिकारी जागोजागी अपमानीत करत होते. युवक काँग्रेसवर कल्पनाच्या वडिलांना प्रथम पासूनच संशय होता तो खरा ठरला. राजकारणातली  जीवघेणी चढाओढ  आता युवक कार्यकर्त्यांमध्येही होताना स्पष्ट दिसते आहे. अशा परीस्थित राजकीय पक्षातील महिला युवतींची अशी दश होत असेल तर सर्वसाधारण महिलांच्या सुरक्षेच काय? असा सवाल उपस्थित करत आहे


घटनाक्रम



  • 21 मार्च 2014 हा  कल्पना गायब झाली

  • 24 मार्चला कल्पनाचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरनजीक पाचुंदा तलावात सापडला

  • 24 तारखेलाच रात्री उशिरा कल्पनाचा मृतदेह लातुरात आणण्यात आला व लगेचच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले 

  • 26 मार्च रोजी कल्पनाचा भाऊ गणेश गिरी यांनी कल्पनाचा बलात्कार करून खून करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल केली

  • 28 तारखेला संध्याकाळी पोलिसांनी कल्पना गिरी यांच्या हत्येप्रकरणी  युवक काँग्रेसचाच अध्यक्ष महेंद्रसिंग चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली 

  • 13 एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर याला पोलिसांनी अटक केली

  • 15 एप्रिल रोजी चौथा संशयीत आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली

  • शेट्टीला पाच दिवसांची प्रथम पोलिस कोठडी सुनावल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन  कोठडी सुनावण्यात आली होती

  • त्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती