एक्स्प्लोर

Riteish Deshmukh : रितेश आणि जिनिलियाला दिलासा, लातूर MIDC भूखंड प्रकरणात क्लीनचिट

Latur MIDC : देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या रितेश आणि जिनिलिया यांच्या मालकीच्या भूखंडाची चौकशी सुरू होती, यानंतर आता सहकार विभागाचा अहवाल आला आहे. दोघांनीही सहकार विभागाकडून क्लीनचिट मिळाली आहे.

Mumbai : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या मालकीच्या कंपनीला लातूरमध्ये  (Latur MIDC) देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू होती. यानंतर आता सहकार विभागाचा अहवाल आला आहे. रितेश आणि जिनिलिया देशमुख यांना सहकार विभागाकडून क्लीनचिट मिळाली आहे. एमआयडीसीचे सीईओ बीपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत होते. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला महिन्याभराच्या आतच 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. 

रितेश आणि जिनिलियाच्या देश अॅग्रो या कंपनीवर लातूर भाजपाने आक्षेप घेतले होते. भाजपाने 19 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी केली होती. यानंतर 

लातूर एमआयडीसीच्या भूखंड चौकशी अहवालात जिल्हा उपनिबंधकांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर आधारित रिपोर्ट देण्यात आला आहे. भाजपच्या मागणीप्रमाणे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो कंपनीची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीदरम्यान कंपनीशी संबंधित कोणतेही अनियमितता आढळून आली नाही.

भाजपच्या आरोपांनंतर चौकशी

लातूर भाजपचे शहर अध्यक्ष गुरुनाथ मगे आणि शहर उपाध्यक्ष अॅड. प्रदीप मोरे यांनी लातूर भूखंडप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या आरोपांनंतर शासकीय पातळीवर चौकशी सुरू झाली. जिल्हा निबंधक कार्यालयाने भूखंड प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअखेरीस कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. एक प्रकारे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो कंपनीला क्लीनचिट देण्यात आली आहे.

काय होते आरोप?  

लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकांची प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलण्यात आले आणि रितेश-जिनिलियाच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भूखंड देण्यात आला. हा भूखंड अवघ्या 10 दिवसांत त्यांना देण्यात आला. तसेच या कंपनीला एकाच महिन्यात 120 कोटींचे कर्जही मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले होते.

भूखंडाचे वाटप प्रक्रियेनुसारच, कंपनीचा खुलासा 

देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीच्या वतीनेही या प्रकरणी खुलासा करण्यात आला होता. कंपनीसंबंधी घेण्यात आलेले आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. लातूर परिसरातील शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि तेथे कृषी आधारित उ‌द्योगांची वाढ व्हावी, या उद्देशाने देश अॅग्रोची स्थापना करण्यात आली, असे कंपनीचे म्हणणे होते. सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन आधारित विशेष उत्पादने या कंपनीत घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औदयोगिक विकास महामंडळा (MIDC) ने अतिरिक्त लातूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड या उद्योग घटकास रितसर आणि नियमानुसार लिजवर दिलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Abhimanyu Pawar : 15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget