Latur Latest marathi News Update: वेळेवर सगळी प्रक्रिया करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नव्हती. त्यामुळे शेतकरी वारंवार महावितरणाच्या दारात जात होते.. अनेकदा अधिकारी आणि शेतकरी यांच्यात अनेक वेळा शाब्दिक वाद होतात. असाच वाद लातूरमधील निलंगा येथील महावितरणच्या कार्यलयात झाला... त्यावेळी महावितरण अधिकाऱ्यानं डिमांड (पैसे) भरली म्हणजे साखरपुडा झालाय... कनेक्शन मिळेल त्यावेळेस लग्न होईल... मग वीज पुरवठाही सुरळीत होईल.. असे सांगत वेळ मारून नेली... मग काय अधिकाऱ्याच्या उदाहरणानंतर शेतकरी चक्क नवरदेव बनून वाजतगाजत वीज वितरण कार्यालयावर धडकले. निलंगा येथील शेतकऱ्यांचं हेच आंदोलन सध्या चर्चेचा विषय आहे... 


महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेती ही कोरडवाहू आहे. शेतीसाठी  आपार कष्ट करून शेतकरी पाण्याची सोय करत असतो. मग कृषी पंप आला त्यासाठीची वीज जोडणी आली आणि त्यासाठी मग महावितरणच्या कार्यालयातल्या फेऱ्या वाढल्या. डिमांड भरून देखील कृषी पंपाला कनेक्शन मिळत नाही. शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही डिमांड भरली आहे, कनेक्शन द्या असं विनवणी करतात. त्याचवेळी संतापलेले उप अभियंता शैलेश पाटील यांनी उदाहरण देत एक वाक्य बोलले... डिमांड भरली म्हणजे साखरपुडा झालाय... कनेक्शन मिळेल त्यावेळेस लग्न होईल... मग वीज पुरवठाही सुरळीत होईल.. असे सांगत वेळ मारून नेली. नेमकं याच वेळेस शेतकऱ्यांचा संतापाचा कडेलोट झाला होता. दिव्यांचे पैसे भरलेत, वेळोवेळी चकरा मारल्यात मात्र अनेक दिवस झाल्यानंतर सुद्धा कनेक्शन मिळत नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला. अशाच प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला होता, त्यांना एकत्रित करण्यात आलं. दिवस ठरला... वेळ ठरली... शेतकरी घोड्यावर बसले. बँड आला.. बाजा आला.. वराती सजले... सुवासिनी आनंदाने पुढे चालू लागल्या. हातात फलक घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे निलंगा महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपट उडाली. नेमकं आंदोलन काय आहे? कशाचं आहे? याची माहिती घेत निलंगामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. 


शेतामध्ये मी बोर घेतला आहे. पाण्याची सोय झाली म्हणून मी आनंदात होतो. वेगवेगळी पिके घेतली होती. डिमांड भरून सगळे प्रोसेस करून मी तयार होतो. मात्र महावितरणचे कर्मचारी काही जोडणी करायला तयार नव्हते. त्यांना भेटायला गेलो विचारलं. अधिकारी म्हणाले डिमांड भरली म्हणजे साखरपुडा झालाय, लग्नाची तारीख आम्ही सांगू शकत नाहीत. तुम्ही तयार नाही तर लग्नाला तयार होऊन आम्ही  येतो, आता तरी जोडणी द्या यासाठी हे आंदोलन केले आहे, असे मत जाऊ या गावातील शेतकरी संतोष हिरास यांनी मांडले आहे. सामाजिक कार्यकर्ते लिंबन महाराज रेशमे यांच्या नेतृतवाखालील हे आंदोलन करण्यात आले. निलंगा तालुक्यातील अनेक गावात डिमांड भरलेले शेतकरी आहेत. ते वेळोवेळी प्रशासनाकडे जातात मात्र तेथे त्याच्या हातातला काहीही पडत नाही. वेळ मारून नेणारे उत्तर पदरी पडत असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्र करत हे आंदोलन उभे केले आहे असं मत त्यांनी मांडलं