Sambhaji Patil Nilangekar: मागील अनेक दिवसांपासून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती... यावर भाजपातून आणि काँग्रेस मधून कधीही उघड बोलले गेले नाही...मात्र ते काही भाजपात येत नाहीत आणि आम्ही काही त्यांना भाजपात घेत नाही असं वक्तव्य संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय. आणखी काय काय म्हणलाते संभाजी पाटील... आणि त्यामुळे देशमुखांची कशी अडचण होवू शकते.


माजी मंत्री आणि भाजप नेते संभाजी पाटील...यांनी केलेली वक्तव्य लातूरच्या राजकारणात नवं वळण देणारी ठरतील. कारण, संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रिन्स म्हणून ज्यांचा उल्लेख केलाय ते दोन्ही नेते लातूरकरांना ठाऊक आहेत.. अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्याबद्दल केलेल्या संभाजी पाटील यांच्या वक्तव्यानंतर मोठा प्रश्न उपस्थित झालाय. आणि तो म्हणजे अमित आणि धीरज देशमुख भाजपात येणार होते का?


महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसला खिंडार पडणार अशाच चर्चा होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि लातूरचे देशमुख बंधू भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या. त्यातच भारत जोडो यात्रेतील सहभागावरुनही दोन्ही नेते कायम चर्चेत राहिले. तिकडे, अशोक चव्हाणांसह देशमुख बंधूंनी कायम या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं. पण, संभाजी पाटलांच्या वक्तव्य केलं आणि देखमुखांच्या भाजप प्रवेशाची कहाणी कशी संपली, तेच स्पष्ट केलं. तिकडे भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली..भविष्यात काँग्रेसकडे उमेदवारही उरणार नाही..असा दावा करत..अनेक पक्षप्रवेशाचा दावा केलाय.


खरंतर, लातूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे..आणि हे वर्चस्व मोडून काढायचं असेल..तर भाजपला देखमुखांना सोबत घ्यावं लागणारय. त्यातच लातूर महापालिकेसह जिल्हा परिषदेच्याही निवडणूका लागतील..त्याचसाठी भाजपनं प्लॅनिंग सुरु केलंय. पण, या सगळ्या घडामोडींच्या सुरुवातीलाच..निलंगेकरांनी देखमुखांच्या एन्ट्रीलाच ब्रेक लावलाय. जिल्ह्यातील नेतृत्वाच्या लढाईत आजघडीला तरी देखमुख विरुद्ध निलगेंकर असं चित्र आहे. पण, काय आहे. हे राजकारण आहे..इथं सगळेच पर्याय कायम खुले असतात..आजचे कट्टर विरोधक उद्याचे पक्के मित्र बनतात..तर कुठे सख्खे मित्र पक्के वैरी बनतात.


काय म्हणाले होते संभाजी पाटील ?
लातूरचे प्रिन्स राजकुमार असलेले आमदार अमित देशमुख हे कधीही जनतेचा प्रश्न घेऊन लोकात गेलेले नाहीत. आता भाजपात येतो अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपात घेणार नाही आणि ते काही भाजपात येणार नाहीत. कारण त्यांचं भाजपात येणं माझ्या युवा कार्यकर्त्यांना बिलकुल आवडणार नाही, असे वक्तव्य संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं.