लातूर:  लातूरच्या (Latur)  औसा तालुक्यातील लामजनामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा झाला आहे.  शाळेतच हाणामारी (School Free Style Fighting)  झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी हतबल झाले. गावकऱ्यांमधील राडा, हाणामारी मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. 


कोणत्याही शाळेची उन्नती करण्यासाठी गाव पातळीवर शिस्तपालन समिती काम करत असते. गावातील काही लोक आणि शाळेतील शिक्षक यांच्यात समन्वय ठेवत पाल्याच्या उन्नतीसाठी शिस्तपालन समिती काम करते. मात्र यातील निवडीवरून बेशिस्त वर्तन करतानाचा राडा  मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे.  शालेय व्यवस्थापन समिती निवडीवरुन शाळेत पालक आणि ग्रामस्थांमध्ये राडा झाला आहे. लामजना येथील जिल्हा परिषद शाळेतील हा घडला आहे. गावातील काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हातात दगड घेऊन पालक आणि काही नागरिक समोरासमोर भिडले होते. मोबाईल कमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ  समोर आला आहे. 


राड्याचा व्हिडीओ समोर


औसा तालुक्यातील लामजना येथे शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या वेळी मोठा गोंधळ झाला आहे. सर्वसाधारण गटातून तीन ऐवजी पाच पालकांचा समितीत समावेश करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली होती. या मागणीवरून पालक आणि गावातील काही नागरिकांमध्ये वाद सुरू झाला. यांचा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटाने त्या ठिकाणी राडा घालायला सुरुवात केली. या ठिकाणी मोठा गोंधळ झाला. या राड्यात काहींनी हातात दगड घेऊन लोक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.


किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


घटनास्थळी पोलीसांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.या सगळ्या रडल्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची बैठक मुख्याध्यापिकांनी तहकूब केली आहे . पण या सर्व प्रकार गावातील काही लोकांनी जाणीवपूर्वक केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणात आता किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.


हे ही वाचा :


Indapur Accident : मोठी बातमी! इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात, बसची टेम्पोला जोरदार धडक