Indapur School Picnic Bus Accident : इंदापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात (Bus Accident) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेच्या सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थीही होते. अपघातावेळी बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थीही उपस्थित होते. अवघड वळणावर टेम्पोला बसची धडक बसून ही दुर्घटना घडली आहे.


बसची टेम्पोला धडक


इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर, एक शिक्षक जखमी झाला आहे. शिक्षकांसह बसमध्ये विद्यार्थीही होते. अपघातात लहान विद्यार्थीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


एका शिक्षकाचा जागीच मृत्यू, विद्यार्थी जखमी


आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला. शैक्षणिक सहलीची बस आणि टेम्पोचा अपघात झाला. शालेय विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. अपघात झाला तो आयशर टेम्पो होता. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. हा टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.


अपघात नेमका कसा घडला?


कोकणातून सहलीवरून परत येणाऱ्या शाळेच्या एसटी बसने थांबलेल्या टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा एक शिक्षक आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास ही सहलीची बस माळशिरस अकलूज रोडवरील वटफळे येथे आली असता वळणावर थांबलेल्या टेम्पोला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला.


इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन ही एसटी बस कोकणात गेली होती. गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथून परत येताना वळणावरील टेम्पो न दिसल्याने बसची टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झाला. या अपघातात शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे शिक्षक रमाकांत शिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या अपघातात काही विद्यार्थीही जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस शिवाजी विद्यालय बावड्याची सहलीसाठी गेली होती. अकलूजच्या जवळ आल्यावर एका वळणावर बांबू घेऊन जाणारा टेम्पो पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. पहाटेच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या टेम्पोचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.