Gautami Patil Dance : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणत लातुरातील (Latur) तरुणांनी केलेला स्टंट अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता. मात्र संयोजकांनी वेळच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे. कारण, गौतमी पाटीलचा डान्स (Dance) पाहण्यासाठी चक्क तरुण 'विद्युत डीपी'च्या खांबाला पकडून उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. मात्र, हे आयोजकांच्या लक्षात येताच तात्काळ कार्यक्रम थांबवून या तरुणांना बाजूला करण्यात आले


नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तरुणच नव्हे सर्व वयोगटातील लोकं गौतमी पाटीलच्या नृत्याचे दिवाणे आहेत. अनेक ठिकाणी गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम होत असतात आणि चर्चेत देखील येतात. लातूरमध्ये काल झालेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. लातूरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी चक्क चालू असलेल्या ट्रान्सफॉर्मरचां आधार घेत कार्यक्रम पाहिला. उच्च वीज पुरवठा करणाऱ्या खांबाच्या बाजूला असलेल्या डीपीला अतिशय जवळ उभे राहून मोबाईल कॅमेऱ्यात गौतमी पाटीलचा  नृत्य कैद करण्यासाठी तरुणाची धडपड सुरू होती. यातील धोका वेळीच आयोजकांच्या लक्षात आला. त्यामुळे कार्यक्रम तात्काळ थांबिविण्यात आला. त्या तरुणांना धोकाची जाणीव करून देण्यात आली आणि त्यानंतरच पुढील कार्यक्रम पार पडला.


मोठा अनर्थ टळला...


काल लातूर शहरातील एका बिर्याणी हॉटेलच्या उद्घाटनासाठी गौतमी पाटीलला बोलविण्यात आले होते. लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात या हॉटेलचे उद्घाटन गौतमी यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचवेळी गौतमीची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, मिळेल त्या ठिकाणी लोकं उभं राहून गौतमीचा कार्यक्रम पाहत होते. मात्र, काही तरुणांना जागाच मिळाली नाही. त्यामुळे समोर असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा आधार घेत त्यांनी कार्यक्रम पाहिला. विद्युत डीपीला लावण्यात आलेल्या खांबाला पकडून गौतमीचा डान्स आपल्या मोबाईलमध्ये तरुण कैद करत होते. विशेष म्हणजे यावेळी विद्युत डीपीत वीज पुरवठा देखील सुरु होता. मात्र, काही लोकांनी ही गोष्ट आयोजकांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे तात्काळ कार्यक्रम थांबवला गेला. तसेच, विद्युत डीपीला चिटकून उभं राहिलेल्या लोकांना बाजूला करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur Crime News : आधी पाय तोडला, मग चेहऱ्यावरचे कातडे सोलून काढले; मोबाईल चोरीच्या संशयावरुन शाळकरी मुलाची हत्या