Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमठा खु. शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, मोबाईल चोरीच्या संशयावरुन 15 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. हत्या इतका निर्घृणपणे करण्यात आली आहे की, क्रूरतेची सीमाच ओलांडली आहे. मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे. संतोष गोविंद घुगे (वय 15, रा. कुमठा खु. ता. उदगीर) असे मयताचे नाव असून, ज्ञानोबा देवनाळे (वय 28 वर्ष, रा. पिंपरी ता. उदगीर) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील कुमठा खु. गावातील रस्त्याच्या अंदाजे दोनशे मीटरच्या आत असलेल्या एका शेतात एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत होता. त्यावेळी त्याला एक प्रेत आढळून आल्याने याची माहिती गावात देण्यात आली. गावकऱ्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस देखील काही वेळात घटनास्थळी पोहचले. मृताची ओळख व मारेकऱ्याच्या शोधासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान पथक येण्यापूर्वीच उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद यांनी तपासाचे चक्र फिरवत मारेकऱ्याचा शोध लावला. विशेष म्हणजे, मोबाईल चोरीच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आरोपी शेतात सालगडी होता...
मयत संतोष गोविंद घुगे नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा खून करण ज्ञानोबा देवनाळे याने केला आहे. घटनास्थळी पासून जवळच असलेल्या एका शेतात तो सालगडी आहे. त्यास संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या अंदाजे चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली
शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संतोष गोविंद घुगे या शाळकरी मुलाचे बेवारस प्रेत मृतावस्थेत आढळले. अंदाजे चार दिवसांपूर्वी त्याचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पोलिसांनी तपासाची चक्रे करून एका तासात मारेकऱ्याचा शोध लावला आहे. हा खून मोबाईल चोरीच्या संशयावरुन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले. हत्या करतांना क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली आहे. मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे. यामुळे प्रेताची ओळख पटणे अवघड झाले होते. परंतु, पोलिसांनी काही तासातच आरोपींचा शोध लावून त्याला बेड्या ठोकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या :