कोल्हापूर : दोघांना पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) चिरडून मारणाऱ्या पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पल थेट कचऱ्यात टाकून देण्यात आल्यानंतर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्यातील ससून हॉस्पिटलची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. विनायक काळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीनंतर मुश्रीफ यांनी शेरा मारल्याने डाॅक्टर अजय तावरेची नियुक्ती अधीक्षक पदावर करण्यात आली होती, असे काल पत्रकार परिषदेत केले होते. यानंतर विनायक काळे यांना सुद्धा सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. विनायक काळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मंत्र्यांच नाव घेतल्यानेच कारवाई करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. 


विनायक काळे यांच्यावर कारवाई का करण्यात आली?


या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा (Hasan Mushrif on Sassoon Hospital Dean )केला. मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितले की, डॉक्टर तावरेबाबत मी अनेकवेळा खुलासा केला आहे. आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावर मी शेरा मारला आहे. मात्र यापूर्वी याच ससून हॉस्पिटलमध्ये उंदीर चावून एकाचा मृत्यू झाल्यानंतर तावरेवर कारवाई करण्यात आली होती. तसेच पदमुक्त करण्यात आलं होतं. मात्र पदावर नसताना तावरेनं हा कारनामा केला आहे. ही चूक अक्षम्य असून त्यांना जीवनाची अद्दल घडवणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. पुन्हा अशी चूक कोणाकडून होणार नाही, अशी कारवाई तावरेवर केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 


पैशाच्या लालसेपोटी डॉक्टर तावरेनं केलेला कारनामा चुकीचा


विनायक काळे यांच्यावर कारवाई का करण्यात आली? याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सॅम्पल कचऱ्यामध्ये फेकून देण्याच्या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीकडून विनायक काळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी त्याची पार पाडली नाही, त्यांनी निष्काळजीपणा दाखवला असल्याने सक्तीच्या राज्यावर पाठवण्यात आल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. पैशाचे लालसेपोटी डॉक्टर तावरेनं केलेला कारनामा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा हे खपवून घेणार नाहीत, दोषींवर कारवाई केली जाईल, कितीही मोठा असला, तरी कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या