एक्स्प्लोर

Eknath Shinde : विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम करु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रायगडावर गर्जना

दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिथीनुसार झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

रायगड : सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आह, पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले. दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिथीनुसार झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदय सामंत देखील हजर होते. यावेळी शिवभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ मासाहेब की जय अजय घोष यावेळी सुरू होता.

विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिवभक्तांनी उचलून धरला

रायगडावर विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिवभक्तांनी उचलून धरला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणावेळी उत्तर दिले. तसेच रायगडच्या विकासासाठी आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी सरकार देत असलेला निधी याचा उल्लेख देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे ही घोषणा संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच रायगडमधील महाड येथील गोहत्या वरील फलक देखील झळकवले जात होते. विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा नेत्यांच्या भाषणावेळी देखील घोषणा देऊन उपस्थित केला गेला. 

कार्यक्रमावेळी रायगडावर राज दरबारामध्ये आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे असे बॅनर झळकले. नेत्यांची भाषणे सुरू असताना देखील शिवभक्तांमधून अशाच प्रकारच्या घोषणा यावेळी दिल्या गेल्या. वक्फ बोर्ड विरोधात यावेळी नाराजी व्यक्त केली जात होती. ज्या शिवभक्तांच्या भावना त्या आमच्या भावना  दरम्यान, उदय सामंत आणि अजित पवार यांनी ज्या शिवभक्तांच्या भावना त्या आमच्या भावना असे विधान केले. राज्याभिषेक सोहळा वेळी शिवभक्तमधुन आई भवानी शक्ति दे विशाळगडाला मुक्ती दे आसा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांनंतर सामंत आणि पवार यानी हे विधान केले.

सरकार शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालत आहे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे सरकार शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालत आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार असा आश्वासन शिवभक्तांना दिले. विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा यावेळी जाणवत होता. त्याबाबतचे फलक आणि घोषणाबाजी शिवभक्तांमधून होत होती. त्यामुळे प्रत्येक नेत्यांना आपल्या भाषणातून या मुद्द्याला स्पर्श केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget