Hatkanangle Lok Sabha Constituency : जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत प्रचार नाही; आणखी एका भाजप नेत्याची धैर्यशील मानेंविरोधात नाराजी

शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना मतदारसंघातून गायब झाल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून सडकून टीका होत असतानाच आता भाजप नेत्यांच्या नाराजीला सुद्धा सामोरे जाव लागत आहे.

Continues below advertisement

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle Lok Sabha constituency) शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी बाजी मारली असली, तरी मतदारसंघांमधील नाराजी दूर करण्यात मात्र त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. अंतर्गत विरोध होत असतानाच भाजपमधील नेत्यांचा सुद्धा त्यांना कडाडून विरोध होत आहे. मतदारसंघातून गायब झाल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून सडकून टीका होत असतानाच आता भाजप नेत्यांच्या नाराजीला सुद्धा सामोरे जाव लागत आहे.

Continues below advertisement

जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नाही

हातकणंगले लोकसभेला आवाडे गट विरोधात असताना आता संजय पाटील यांनी सुद्धा धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे. संजय पाटील स्वतः हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ शिंदेंकडे राहिल्याने उमेदवारी पुन्हा एकदा माने यांना मिळाली आहे. 

धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये यासाठी दबाव 

संजय पाटील यांनी बोलताना सांगितले की, धैर्यशील माने यांच्या बद्दल हातकणंगलेमध्ये निगेटिव्हिटी आहे. एक खासदार कमी होऊ शकतो, याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच मतदारसंघांमधील नेत्यांना कल्पना दिली असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, माझे सर्व पक्षातील नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला असल्याचे संजय पाटील यांनी म्हटले आहे. 

धैर्यशील माने यांना इचलकरंजी भाजप कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा रोषाचा सामना करावा लागला होता. आवाडे गटही धैर्यशील माने यांच्याविरोधात असून त्यांनीही उघड विरोधी भूमिका घेतली आहे. राहुल आवाडे बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola