कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. आजपासून (31 मार्च) ही सेवा पूर्ववत होणार असल्याने भाविकांसह पर्यटक, उद्योजकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपतीमधील बालाजी देवस्थानचा मोठा ऋणानुबंध आहे. दोन्हीकडे धार्मिक महत्त्व प्रचंड असल्याने या मार्गावर विमानसेवा पूर्वत करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती.  त्यामुळे आता ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. 






आठवड्यातून तीन दिवस सेवा


कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते तिरुपती या मार्गावर आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवसात ही सेवा उपलब्ध असणार आहे. 






वेळ कशी असणार? तिकिट किती असणार


कोल्हापूर विमानतळावरून सकाळी 11 वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी 12:10 मिनिटांनी विमान ते तिरुपतीला पोहोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात तिरुपतीहून दुपारी साडेबारा वाजता विमान सुटून दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यामुळे कोल्हापुरात तिरुपती ही दोन धार्मिक स्थळे या निमित्ताने पुन्हा एकदा जोडली जाणार आहेत. या सेवेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. या मार्गावरील 2 हजार 999 रुपये तिकिट दर असेल. 




यापूर्वी इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरुपती सेवा सुरू होती. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर उद्योजक पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. 


इतर महत्वाच्या बातम्या