Horoscope Today 25 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 जून 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात एखाद्या नवीन काम अंगावर पडेल, परंतु त्याची उत्कृष्ट जबाबदारी पेलल्यामुळे वरिष्ठ खूश होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज थोडा अहंकार बाजूला ठेवून सर्वांमध्ये मिळून मिसळून राहिलात तर पुढच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज ज्यांना त्वचारोग आहे, त्यांनी व्यवस्थित औषध पाणी घ्यावे मेंदूवर ताण येईल असे कोणतेही काम न करणे हितावह ठरेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो हुकमी यश सातत्यपूर्ण प्रयत्न आणि निश्चित मिळेल, प्रत्येक आव्हानाला योग्य प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक की एकाग्रता साधेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो महिलांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवावेत, चाकोरीमध्ये यशाची सवय थोडा आळशी बनवेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज नवा विचार करायचा म्हणजे, धोका पत्करणं आलंच त्यासाठी आज सज्ज व्हा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःबद्दल थोडा शांतपणे विचार करा, सवयींची गुलामगिरी सोडून दिली तर अधिक कार्यक्षमतेने कामाला लागल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या शत्रूंना गारद कराल आणि स्पर्धेला धीराने तोंड द्याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज जी गोष्ट आतापर्यंत केली नाही, त्या गोष्टींचा मागवा घ्याल आणि अचानक यश पदरात पडेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आपल्या बुद्धीचा उपयोग सकारात्मक कामासाठी करा. हाताखालच्या लोकांना सांभाळून घ्यावे लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज रागाला आवर घातला नाही तर लोकांचे सहकार्य मिळणार नाही. नवीन जागेचे व्यवहार होऊ शकतात
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिला स्वकर्तुत्वाने पुढे येतील, ज्या व्यक्ती संशोधन क्षेत्रात आहेत, त्यांनी संशोधन चालू ठेवावे.
हेही वाचा :
25 जून तारीख एक गेमचेंजर! शुभ योगांनी 'या' 5 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार, नोकरीत प्रमोशन, उत्पन्नाचे नवे मार्ग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
