एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात पोलिसांसमोर फलकबाजीवरून वर्चस्ववादातून दोन गटाचा नंगानाच; तुंबळ दगडफेक अन् जाळपोळ करत दहशत, वाहनांची तोडफोड

Kolhapur News: हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत.

Kolhapur News: कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकात कमानीजवळ काल रात्री (22 ऑगस्ट) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवस वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापनदिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून काल दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता. या चौकात वर्चस्व कुणाचं यावरुन देखील अनेक वर्ष तरुणांमध्ये वाद आहे. काल सायंकाळी हा वाद उफाळून आला. 

ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले

दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संतपलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागून जमाबावर नियंत्रण आणलं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने हा वाद अधिक तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही जमावला पांगवलं. तर काहींना ताब्यात घेतलं आहे. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दगडफेकीत पोलिस जखमी

दरम्यान, वादाला सुरुवात झाल्यानंतरल मोजका पोलिस बंदोबस्त तैनात होता. यावेळी दोन्ही बाजूकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावासमोर पोलिसांची हतबलता झाली. यानंतर अतिरिक कुमक मागवण्यात आली. स्वत: पोलिस अधीक्षक योगेश गुप्ताही दाखल झाले. कोल्हापूर सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत काही पोलिस सुद्धा जखमी झाले आहेत. दगडफेकीत अनेक वाहनांना सुद्धा लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात काचा आणि दगडांचा खच पडला होता. वीज पुरवठा खंडित असल्याने सुद्धा कोण कोणावर दगडफेक करत आहे याबाबत समजून येत नव्हते. 

कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

शुक्र स.11 वा.
एका मंडळानं वर्धापन दिनाचा फलक उभारला

शुक्र स.11.30वा.
ध्वनिक्षेपक उभारुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न

शुक्र दु.12 वा.
सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात

शुक्र दु.1 वा.
पोलिसांकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात

शुक्र सायं.6 वा.
मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी

शुक्र सायं.7 वा.
वर्धापन दिनाचे आणखी तीन नवे फलक उभारले

शुक्र रात्री 9 वा.
साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी

शुक्र रात्री 9.30 वा.
दोन गट समोरासमोर,दगडफेक

शुक्र रात्री 10 वा.
दोन्ही गटाकडून दगडफेक, वाहनांची जाळपोळ

शुक्र रात्री १०.१५ वा.
पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल

शुक्र रात्री 11 वा.
पोलिसांचा जमावाशी संवाद

शुक्र रात्री 11.15 वा.
सिद्धार्थनगरमधील परिस्थिती नियंत्रणात

शनि.स. 7 वा.
रात्रीपासूनच पोलिसांची गस्त,सकाळी तगडा बंदोबस्त

शनि.स.7 वा.
रात्रीच्या हिंसाचारात 10 वाहनांचे नुकसान समोर

शनि.स. 7 वा.
150 दंगेखोरांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget