Kolhapur News : घरगुती मुर्तींसह सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन (Ganesha immersion) वेळेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर मनपा प्रशासन स्वयंचलित यंत्रणा (automatic system) उभीर करणार आहे. त्यामुळे मुर्ती विर्सजन प्रक्रिया अधिका काळ न रेंगाळता लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. गेल्यावर्षी महापालिकेने हा प्रयोग केला होता. त्यावेळी वेळेत बचत होऊन लहान मुर्त्यांचे विसर्जन अधिक सुलभ झाले होते. 


कोल्हापूर मनपाचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, स्वयंचलित गणेश विसर्जन  यंत्रणेचा आराखडा तयार करून घेतला आहे. त्यसाठी तज्ज्ञांची छाननी करण्यात आली आहे. ही यंत्रणा मजबूत करण्यासाठी  आमचे प्रयत्न आहेत. कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना नियम आणि शासकीय निर्बंधामध्येच गणेशोत्सव साजरा झाला होता. मोठ्या मुर्त्यांवरही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोना संकट दूर झाल्याने तसेच नव्या सरकारने हात सैल केल्याने यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात होण्याची शक्यता आहे.  


गेल्यावर्षी मिरवणुका सुद्धा झालेल्या नव्हत्या. तसेच सर्व मुर्तींचे विसर्जन इराणी खाणीमध्ये करण्यात आले होते. यावेळी मनपा प्रशासनाकडून स्वयंचलित यंत्रणा उभी केल्याने प्रयोग चांगलाच यशस्वी झाला होता. त्यामुळे हा अनुभव लक्षात यावेळी स्वयंचलित यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे. 


याचाच एक भाग म्हणून त्यासाठी मॅकेनिकल डिझाईन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी बेल्ट कन्व्हेअर पुण्यातील एका कंपनीकडून घेतला जाणार आहे. यासाठी इराणी खाणीच्या बाजूला मजबूत फाऊंडेशन बांधण्यात येत आहे. त्या ठिकामी बेल्ट बसवला जाईल. गणेशमुर्ती विसर्जनासाठी खाणीजवळ पोहोचल्यानंतर या बेल्टवरून मुर्तींचे विसर्जन केले जाईल. त्यामुळे खाणीच्या मध्यभागी मुर्तीचे विसर्जन होण्यास मदत होणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या