Panhala Landslide : पन्हाळगड-पावनगड मार्गावर आज पुन्हा एकदा सकाळी भूस्खलन झालं आहे. गेल्या चार दिवसांमधील ही भूस्खलन घटना असून वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक होत चालला आहे. पावनगड येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे वारंवार अशा घटना घडत राहिल्यास हा मार्ग नागरिकांसाठी बंद होऊ शकतो. त्यामुळे कायमच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


गेल्या तीन वर्षांपासून पन्हाळ गडाची चिरेबंदी आणि गडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर दरडी कोसळल्याने स्थानिक जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. पन्हाळा- पावनगड हा ग्रामस्थांना वाहतुकीसाठी एकमेव मार्ग आहे. गेल्यावर्षीही गडाच्या मुख्य मार्गावर भूस्खलन झाल्याने तब्बल वर्षभर पन्हाळा रस्ता बंद करण्यात आला होता. यानंतर नगपालिकेकडून बुधवार पेठेतून गडावर जाण्यासाठी पर्याची मार्ग तयार करत दुचाकींना परवानगी दिली होती. मात्र, कालांतराने अवजड वाहतूकही सुरु झाल्याने रस्ता पुन्हा धोकादायक झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या