Kolhapur News : राज्यासह कोल्हापूरमध्ये काल स्वातंत्र्यदिन अपूर्व उत्साहात साजरा होत असताना त्याला गालबोट लावण्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. शहरातील शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्या कार्यक्रमात भर दिवसा डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नाचवत असलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याने संतापाची लाट पसरली आहे. 


याच कार्यक्रमात अश्लील हावभावही होत असल्याचे दिसून येते. या डान्सच्या ठिकाणी सिगारेट सुद्धा ओढत असताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोरच हे सगळे कृत्य सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार हे सगळे तृतीयपंथी असल्याच सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध शिवसेना शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार ते प्रशासनाकडे करणार असून असली कृत्ये खपवून घेणार नसल्याचा इरा त्यांनी दिला. 


काल दुपारी हा धार्मिक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नृत्य करत होते. विशेष म्हणजे हातात सिगारेट घेत धूम्रपान करीत डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात हा सारा धिंगाणा सुरू होता. यामध्ये हजारो लोक सहभागी झाल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनीच पुरोगामी कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमात असा सारा धिंगाणा सुरु असताना पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या