Kolhapur News : पगार वेळेत मिळत नसल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेतील डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पगार महिन्याला वेळेत व्हावा, यासाठी आज जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. महाराष्ट्र वैद्यकीय संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शने करण्यात आली.
दर महिन्याच्या पाच तारखेला होणारा पगार आता अवेळी होत आहे, तर कधी पगारच येत नसल्याच्या कारणावरून हे डॉक्टर आक्रमक झाले आहेत. पगार वेळेवर येत नसल्यानं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन पगार वेळेवर जमा करावा, अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वैद्यकीय संघटना कोल्हापूरचे अध्यक्ष आसिफ सौदागर यांनी दिला. त्याबाबत निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला दिलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Satej Patil on Sanjay Mandlik : सतेज पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा, पण जिल्ह्याच्या राजकारणात..
- Kolhapur Crime : कोल्हापूरच्या अवघ्या दहावी पास रियाजने आमदारांना मंत्रिपदासाठी 100 कोटींचा चुना लावण्याचा बेत रचला!
- Hasan Mushrif : वेळ आल्यास लोकसभेला शड्डू ठोकणार का? विचारताच हसन मुश्रीफ काय म्हणाले?
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा