Kolhapur News : राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात पार पडला. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सव चिरंतन स्मरणीय राहावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांकडून अभिनव संकल्पना राबवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी वारसा किती समृद्ध आहे याची प्रचिती पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनी आली. 


जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी गावामध्ये घडली. गावच्या उपसरपंचाने गावातील विधवा कुटुंबप्रमुख व गरीब कुटुंबाचा एक वर्षाचा घरफाळा (ग्रामपंयातीकडून वर्षाला आकारली जाणारी घरपट्टी) स्वत:च्या खिशातून भरून समाजाशी आणि गावाशी असलेली बांधिलकीची प्रचिती दिली. अशोक गोविंद गुरव असे उपसंरपचाचे नाव असून त्यांच्या कृतीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीने 30 ते 40 गरीब आणि विधवा कुटुंबप्रमुखांना स्वातंत्र्यदिनी गोड भेट मिळाली.  


कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीकडून विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न राज्याला दिल्यानंतर त्याचीच प्रेरणा घेत अशोक गुरव यांनी  ग्रामपंचायत दिंडेवाडीच्या मासिक सभेत विधवा कुटुंबाचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली होती, पण तो काही प्रश्न मार्गी लागला नाही. 


त्यामुळे निराश न होता त्यांनी भूमिका पुढे नेण्यासाठी दिंडेवाडी गावातील विधवा कुटुंबप्रमुख व गरिब कुटुंबांचा 1 वर्षाचा उपसरपंचपदाच्या मानधनातून भरण्याचा संकल्प केला. या सर्वांच्या घरफळा पावती ते कुटुंबाच्या घरी जाऊन ते सुपूर्द करणार आहेत. गावकरी मंडळींच्या जीवावर, सहकार्यावर, मार्गदर्शनातुन जे पद उपभोगलं त्या आपल्या ऋणातून उतराई व्हावी म्हणून ही सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे त्यांनी सांगितले.   


इतर महत्वाच्या बातम्या