Kolhapur News : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी 75 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला.


यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औधंकर, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, लेखा अधिकारी सुनिल काटे, मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबुराव दबडे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, अंतरगत लेखापरिक्षक प्रशांत पंडत, संजय भोसले, इस्टेट अधिक्षक सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, विजय वणकुद्रे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 


यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यावरण सवर्धणाची हरित शपथ घेण्यात आली.


उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, फायरमन व कर्मचारी यांचा सत्कार


दरम्यान, कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये कोरोना काळात कोरोना रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरववल्यासाठी प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मजूश्री रोहिदास, डॉ. विद्या काळे, डॉ. प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मुसळे, डॉ.रुक्सार मोमीन, डॉ. योगिता भिसे, डॉ.शोभा दाभाडे, डॉ. रुपाली यादव, डॉ. सोनाक्षी पाटील, डॉ. रती अभिवंत, डॉ. अर्पीता खैरमोडे, डॉ. सुनिल नाळे, डॉ. निखिल पाटील, डॉ. विश्वनाथ खैरमोडे, डॉ.सुशिला पावरा यांचा सत्कार करण्यात आला.


30 जून 2022 रोजी एका अज्ञात व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले होते. तेव्हा अग्निशमन विभागाला फोन आल्यानंतर  अग्निशमन वाहनावरील वाहन चालक संदीप व्हनाळकर, तांडेल बाबुराव सनगर, फायरमन सौरभ पाटील यांनी तत्काळ त्या नागरिकास वेळेत रुग्णालयात दाखल करून जीव वाचवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  


तसेच पंचगंगा नदीघाटावर 12 एप्रिल रोजी पंचगंगा विहार मंडळाचे कार्याकर्ते महेश डपळे यांनी नेहमीप्रमाणे पोहायला गेले असता त्यांना एक पुरुष व एक लहान मुलगा बुडताना दिसला होता. त्यावेळी त्यांनी तत्काळ पाण्यात जावून त्या दोन व्यक्तींना तत्काळ पाण्यातून बाहे‍र काढून त्यांना जीव वाचवल्याबद्दल वर्कशॉपचा कर्मचारी महेश डपळे यांचा सत्कार करण्यात आला.


आझादी का अमृत महोत्सवातंर्गत घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव


आझादी का अमृत महोत्सवातंर्गत मनपाकडून घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमधील प्रथम, द्वतीय, तृतीय क्रमांक विजेत्यांचा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाखा पाटील, द्वितीय क्रमांक अक्षता बारटके, तृतीय क्रमांक जानवी वाघ यांनी पटकावला.


इतर महत्त्वाच्या बातम्या