Shivsena : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाला नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरही राजकीय कुरघोडी सुरुच आहेत. आता ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली बोगस असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूरमधील 1400 ते 1500 शपथपत्र आम्ही तपासत असल्याचे पथकाने म्हटले आहे. या संदर्भात मुंबईतील निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


काही शपथपत्र बोगस असल्याचे सांगण्यात आल्यानंतर तपास सुरू असल्याचे या पथकाने सांगितले. तपास झाल्यानंतर अधिक माहिती देवू असेही ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये चार जणांचे पथक दाखल झाले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये या संपूर्ण बाबींचा तपास केला जात आहे.


चार जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरु 


दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत. पोलीस अधीक्षकांचे कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकर यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडे 4 हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे.  ठाकरे गटाच्या शपथपत्रांवरती शिंदे गटाने आक्षेप घेतला असून निवडणुक आयोगाकडे दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्र सादर झाली आहेत. परंतु, ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप केला गेल्यानंतर याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. 


शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने धाव घेत पक्षावर दावा केला आहे. शिवसेना पक्ष आपल्याकडे राहावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत.  काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास 4600 च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही प्रतित्रापत्रे ठाकरे गटांसाठी तयार केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरून देत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या