Jayant Patil On Bjp : सत्तेविना भाजप (Bjp) राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना (Shivsena) फोडली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. मात्र, कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपनं पक्ष फोडल्याचे पाटील म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी चांगली साथ दिली. पवारसाहेबांनीचं पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळं या विरोधी काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल असा टोला देखील पाटील यांनी भाजपला लगावला. 


या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची चाचणी होणार


शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपप्रणित होती असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना फोडण्यात भाजपचा हात असल्याचे यातून स्पष्ट होतं असल्याचे पाटील म्हणाले. ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड, भेद वापरुन फोडणे योग्य आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.


लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत सर्वांचं एकमत झालं पाहिजे


लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे. रस्ते, वीज, पाणी, नैसर्गिक संसाधने कमी पडू लागली आहेत. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत सर्वांचं एकमत झालं पाहिजे, यावर निर्णय घेतला पाहिजे असेही पाटील यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. मात्र शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना जन्म दिला आहे. त्यामुळं शिंदेंवर शिवसेनेचा अधिकार असल्याचे पाटील म्हणाले. शिवसेनेला अशा भावना व्यक्त करायला परवानगी दिली पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले. काल ढगफुटीमुळे लोकांच्या पिकाचं आणि शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असेही पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Andheri East Bypoll : 2019 च्या अकोला लोकसभा मतदारसंघातील पेचाची पुनरावृत्ती अंधेरी पोटनिवडणुकीत होणार?